• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress urmila nimbalkar photos and her love story bmh

‘हॉट’ उर्मिलाची ‘खास’ लव्हस्टोरी!

तब्बल तीन तासांचा चित्रपट होता. पण तिचं पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं.

February 18, 2020 17:52 IST
Follow Us
  • अभिनेत्री आणि व्हिडिओ ब्लॉगर ऊर्मिला निंबाळकर सगळ्यानांच माहिती आहे. ऊर्मिलानं हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. दिया और बाती ही तिची मालिका चांगलीच गाजली. त्याचबरोबर तिने काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
    1/30

    अभिनेत्री आणि व्हिडिओ ब्लॉगर ऊर्मिला निंबाळकर सगळ्यानांच माहिती आहे. ऊर्मिलानं हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. दिया और बाती ही तिची मालिका चांगलीच गाजली. त्याचबरोबर तिने काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

  • 2/30

    ऊर्मिलानं पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं, फॅशन डिझायनरचं शिक्षणही तिनं घेतलं आहे. अभिनयाबरोबरच ऊर्मिला सध्या ट्रव्हलिंग आणि इतर विषयावरील व्हिडीओ ब्लॉग करते.

  • 3/30

    जन्मानेच बारामतीकर असलेल्या ऊर्मिलाची लव्ह स्टोरीही भन्नाट आहे. तिनेचं याविषयीचा किस्सा एकदा सांगितला होता. उर्मिलाची ही स्टोरी अनेकांना आपलीशी वाटणारी आहे.

  • 4/30

    कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना ऊर्मिलाला एक मुलगा आवडायचा. त्याचं नाव सुकीर्त…. ऊर्मिला बारामतीची पण, शिक्षणासाठी ती पुण्याला आली. लहानपणापासूनच नाटकांची आवड असल्यामुळे फर्ग्युसनमध्ये असताना तिनं 'जागर' या नाट्यसंस्थेत काम करण्यास सुरूवात केली.

  • 5/30

    तिथेच तिला सुकीर्त दिसला. त्यानं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाट्य शिबीर केलं होतं. तो येणार म्हणून त्याच्या नावाची तेव्हा खूप हवा निर्माण झाली होती. विशेष म्हणजे त्यावेळी सोशल मीडियाचा काहीच वापर नव्हता. त्यामुळे तो कसा दिसतो ते तिला माहिती नव्हतं.

  • 6/30

    त्यावेळी तू आताच आली आहेस, त्याच्याकडून तुला खूप शिकायला मिळेल, असं तिला बरेचजण सांगत होते. एखाद्या चित्रपटातल्या कथेप्रमाणे तिच्यासोबत सर्वकाही घडत होतं.

  • 7/30

    ती सुद्धा त्याला भेटण्यासाठी उत्सुक झाली होती. एखाद्या हिरोसारखी इमेज तिच्या मनात तेव्हा तयार झाली होती आणि एकदा तालीम सुरु असताना सुकीर्तनं एण्ट्री केली.

  • 8/30

    डोळ्यावर चष्मा, भुरकट केस, चेहऱ्यावर सुंदर हास्य असा एक नम्र मुलगा ऊर्मिला तालीम करीत असलेल्या ठिकाणी आला. सगळे त्याला बघून इतके खूश झाले.

  • 9/30

    एखादी व्यक्ती सगळ्यांना आवडते म्हणजे नक्कीच त्याच्यात काहीतरी असणार हे ऊर्मिलाच्या पहिल्यांदा मनात आलं. नेमकं नंतर तो तिच्याशेजारीच येऊन बसला. तेव्हा ऊर्मिलाच्या हृदयाचे ठोके वाढले.

  • 10/30

    त्याने आपल्याशी बोलावं असं राहून राहून तिला वाटत होतं. पण, तो अगदी त्याच्या विरुद्ध होता. अतिशय साधा, प्रत्येक वाक्याला विनोद करायचे असा त्याचा स्वभाव. तो संपूर्ण दिवस त्याच्याकडे बघण्यातच गेला.

  • 11/30

    त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती त्याला लांबून बघत होते. हे त्याला कळलं आणि तो स्वतःच तिच्याशी बोलायला आला. त्यावेळी सगळे त्याला दादा वगैरे म्हणायचे. पण मला ऊर्मिलाला त्याला दादा म्हणावंस वाटत नव्हतं नाही. याच काळात ऊर्मिला पूर्णपणे त्याच्यावर फिदा झाली.

  • 12/30

    त्याचा सेन्स ऑफ ह्यूमर. आपल्याला खूप काही कळतं असा उगाचच खोटा आविर्भाव न दाखवायच्या त्याच्या स्वभावावर ऊर्मिला भाळली. रात्री नाटकाची तालीम झाल्यानंतर मुलं मुलींना बाइकवरून सोडायचे. हे आजूबाजूचं बघून आपल्यालाही त्याने घरी सोडावं असं ऊर्मिलाला वाटायचं. घडायचं उलटच. भलताच मुलगा मला घरी सोडायचा.

  • 13/30

    त्यानंतर ऊर्मिलाची बारीवीची परीक्षा आली. एक मोठा गॅप गेला. नंतर पुन्हा ऊर्मिला आणि सकीर्त एका नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले. तेव्हा ऊर्मिलावरही जबाबदारी देण्यात आली होती. या काळात तो नेहमी तिच्या पाठीशी असायचा.

  • 14/30

    तिचं कौतुक करायचा आणि त्यादरम्यान ते दोघं एकमेकांचे मित्र झाले. तेव्हा मग तोच ऊर्मिलाला बाइकवरून सोडायला लागला. सगळे मित्रमंडळी एकत्र आले की प्रत्येकजण नाटकातले विनोद सांगायचे.

  • 15/30

    पण सकीर्तचे विनोद ऐकणं ही इतरांसाठी एक पर्वणीच असायची. पण ऊर्मिलाला मात्र त्याचे विनोद कधीच कळायचे नाहीत. विनोद कळाला नाही की तो ऊर्मिलाला विनोदसुद्धा समजावून सांगायचा.

  • 16/30

    एकदा ऊर्मिला त्याला मलाही बाइक चालवायला शिकायचं, असं म्हणाली. मग बाईक चालवायचा प्रयोग सुरू झाला. एकदा सकीर्त ऊर्मिलाच्या मागे बसला होता आणि तिनं ब्रेक दाबला.

  • 17/30

    त्यावर तो जोरात ऊर्मिलावर आदळला. याविषयी बोलताना ऊर्मिला म्हणते, 'ते जे काही फिलिंग होतं ते मी कधीच विसरू शकत नाही. तेव्हा मी हरपून बसले आणि पुढे बाइक शिकणं झालंच नाही.'

  • 18/30

    या घटनेनंतर क्रशचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांना एकमेकांचा खूप सहवास मिळू लागला. मग ऊर्मिलानं स्वतःहून त्याच्याकडून नंबर घेतला. ती त्याला नेहमी फोन करायची. पण त्याला कळत नव्हतं की, ऊर्मिला त्याच्या प्रेमात पडली आहे.

  • 19/30

    मग ऊर्मिलाच्या आयुष्यात पुढचा टप्पा आला. तिला त्याच्यासोबत चित्रपट बघायला जायचं असायचं. पण त्याउलट तो सर्व मित्रमंडळींना घेऊन जायचा.

  • 20/30

    एकदा तो तिला म्हणाला की, ‘हा येत नाहीये, ती पण येत नाहीये…’ यावर ती त्याला म्हणाली ‘ठीक आहे ना..’ पण त्याच्या मनात मात्र वेगळंच होतं.

  • 21/30

    ‘मग काय करायचं आपण नाही जायचं का?’ असं त्याने तिला विचारलं. त्या ऊर्मिला घाबरतच त्याला, ‘आपण जाऊयात का? असं म्हणाली.

  • 22/30

    तिच्या या प्रश्नावर तो एकदम शॉक झाला. ‘आपण दोघंच जायचं फिल्मला..?’ असा प्रतिप्रश्न त्यानं तिला केला. पण हो नाही म्हणता म्हणता शेवटी दोघंच चित्रपट बघायला गेले.

  • 23/30

    तब्बल तीन तासांचा चित्रपट होता. पण तिचं पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं. अशी दोघांमधली मैत्री वाढत गेली.

  • 24/30

    हळूहळू ऊर्मिलाच्या लक्षात आलं की त्याच्या बाइकवर दुसरी कोणती मुलगी बसली तरी तिची चिडचिड होते. आपण किती बालिश वागतोय असंही तिला वाटू लागलं.

  • 25/30

    याच काळात दोघांमध्ये भांडण सुरु झाली. यात तिची कुचंबणा व्हायला लागली. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे कसं सांगायचं हेच तिला कळत नव्हतं.

  • 26/30

    पण, तोही खूप हुशार निघाला. कारण, त्यालाही ऊर्मिला आवडत होती. हे ऊर्मिलाला खूप उशीरा समजलं. आपण कोणाच्या मागे जायचं नाही, आपल्या अॅटिट्यूडमध्ये राहायचं असा त्याचा प्लॅन त्याच्या डोक्यात होता.

  • 27/30

    दुसरीकडं ऊर्मिला मात्र बालिशपणे वागत होती. दोघांमध्ये किरकोळ गोष्टींवरूनसुद्धा भांडण व्हायची. तरीही  दोघं एकत्र होते.

  • 28/30

    ऊर्मिला आताही प्रपोज केलेल्या दिवसाच्या आठवणी लख्ख आठवतात. ती म्हणते, 'मला अजूनही तो दिवस आठवतोय. ९ फेब्रुवारी एकदा असचं बोलता बोलता आम्ही एकमेकांवरच प्रेम सांगून टाकलं.

  • 29/30

    दोघांनीही ठरवून प्रपोज वगैरे काही केलं नाही. पण आपण एकमेकांना खूप जास्त आवडतो आणि आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत, अशी कबुली आम्ही दिली.

  • 30/30

    तेव्हाचा तो क्षण आणि त्यानंतर बरोबर ८ वर्षांनी मुहूर्त वगैरे काहीही न बघता त्याच दिवशी ९ फेब्रुवारीला आम्ही लग्न केलं…. सो नाऊ ही इज माय हसबण्ड, असं ऊर्मिला अगदी आनंदानं सांगते.

Web Title: Actress urmila nimbalkar photos and her love story bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.