काही चित्रपट असे असतात जे प्रदर्शित होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतरही त्यांची जादू सिनेरसिकांच्या मनावर असते. असाच एक चित्रपट म्हणजे 'कोई मिल गया'. ( सौजन्य : सोशल मीडिया) हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला. ( सौजन्य : सोशल मीडिया) विशेष म्हणजे या चित्रपटातील जादू हे पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलं. मात्र जादूच्या मुखवट्यामागील खरा व्यक्ती कोण हे आजही अनेकांना ठाऊक नाही. त्यामुळेच ही भूमिका नेमकी कोणी साकारली हे आज आम्ही सांगणार आहोत. ( सौजन्य : सोशल मीडिया) राकेश रोशन दिग्दर्शित या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत झळकला होता. रोहित असं त्याच्या भूमिकेचं नाव होतं.( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) जादू, रोहित या दोन पात्रांप्रमाणेच निशा हे पात्रही चर्चेत राहिलं. निशा ही भूमिका प्रिती झिंटाने वठविली होती.( सौजन्य : सोशल मीडिया) ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी चित्रपटात रोहितच्या आईची भूमिका साकारली होती. (सौजन्य : सोशल मीडिया) या चित्रपटातील गाणीही प्रंचड लोकप्रिय झाली.( सौजन्य : सोशल मीडिया) या चित्रपटात हृतिकने गतिमंद मुलाची भूमिका साकारली आहे.( सौजन्य : सोशल मीडिया) रोहित गतिमंद असल्यामुळे अनेक जण त्याची खिल्ली उडवतात. मात्र जादू कायम त्याची साथ देतो.( सौजन्य : सोशल मीडिया) रोहितचा मित्र असलेला जादू हा एक एलियन दाखविला असून त्याची भूमिका कोणी साकारली असेल हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो.( सौजन्य : सोशल मीडिया) जादूने अनेकांची मनं जिंकली, मात्र ही भूमिका कोणी साकारली हे कायम गुलदस्त्यात राहिलं.( सौजन्य : सोशल मीडिया) तर जादू ही भूमिका अभिनेता इंद्रवदन पुरोहित यांनी साकारली होती.( सौजन्य : सोशल मीडिया) त्यांच्यासाठी डिझाइन करण्यात आलेला कॉच्युम ऑस्ट्रेलियात तयार करण्यात आला होता.( सौजन्य : सोशल मीडिया)
कोई मिल गया: ‘जादू’च्या मुखवट्यामागील खरा चेहरा
खरा जादू कोण माहितीये?
Web Title: Bollywood movie koi mil gaya jadoo indrwan purohit ssj