• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ratris khel chale 2 star cast real name ssj

‘रात्रीस खेळ चाले 2’ मधील कलाकारांची खरी नावं माहितीयेत?

जाणून घ्या, ‘बघता हा..’ म्हणणाऱ्या गुरवं खरं नाव

March 11, 2020 10:23 IST
Follow Us
    • झी मराठीवरील लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले 2'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. पडद्यावर उत्तम भूमिका साकारत शेवंता, पांडू, छाया,माई, अण्णा या पात्रांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र या प्रमुख पात्रांची खरी नावं फार कमी जणांना माहित आहेत. (सौजन्य : सर्व फोटो फेसबुक, सोशल मीडिया)
    • अण्णा – मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणारे अण्णा यांच्या अभिनयाच्या विविध छटा या मालिकेत पाहायला मिळत आहे. ही मालिका खऱ्या अर्थाने अण्णा या पात्राभोवती फिरताना दिसत आहे. त्यामुळे ते कथेच्या केंद्रस्थानी आहेत. ही भूमिका अभिनेता माधव अभ्यंकर यांनी साकारली आहे. माधव अभ्यंकर हे मूळचे पुण्याचे असून त्यांनी एसपी कॉलेजमधून त्यांनी आपले शिक्षण घेतले आहे. 'ध्यानी मनी', 'विश्वविनायक', 'जगावेगळी अंत्ययात्रा', 'तुकाराम', 'चिरगुट', 'सेकंड इनिंग' सारख्या चित्रपटात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
    • शेवंता- मालिकेतील सर्वात महत्त्वाची व्यक्तीरेखा म्हणजे पाटणकर बाई अर्थात शेवंता. सौंदर्याने अण्णा नाईकला भूरळ घालणाऱ्या शेवंताची भूमिका अपूर्वा नेमळेकरने साकारली आहे. या मालिकेमुळे अपूर्वाच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली.
    • नाथा – नाईक वाड्यात काम करणारा नाथा ही भूमिका विलास थोरात यांनी साकारली आहे.
    • माई – अण्णांची पत्नी अर्थात माई. एक साधीसरळ आणि भोळी गृहिणी म्हणून माईकडे पाहिलं जातं. घरातील प्रत्येकाची काळजी घेणारी, आपल्या पतीच्या दुष्कर्मांचा तिरस्कार करणारी माई या पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ही भूमिका अभिनेत्री शकुंतला नरे यांनी साकारली आहे. त्यांनी “नाकटीच्या लग्नाला यायचं हं” या मालिकेत काम केलं असून “आयला रे” या चित्रपटातही झळकल्या आहेत
    • नेने वकिल – अण्णांचा मित्र म्हणजे नेने वकिल. एकीकडे अण्णांचा मित्र असल्याची बतावणी करणारे नेने वकिल अण्णांची संपत्ती त्यांच्या नकळत बळकावत आहेत. ही भूमिका अभिनेता दिलीप बापट यांनी साकारली आहे.
    • माधव – अण्णा नाईकांचा थोरला मुलगा म्हणजे माधव. ही भूमिका मंगेश साळवीने साकारली आहे. त्याने या मालिकेव्यतिरिक्त काही नाटक, मालिकांमध्येही काम केलं आहे. विशेष म्हणजे मराठीप्रमाणे त्याचं उर्दू भाषेवरही तितकीच पकड आहे. त्याने “सुखन” या उर्दू हिंदी कवितांचे लेखनही केले आहे. तसंच त्याने “माझा अगडबम” आणि हृदयांतर चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.
    • दत्ता – मालिकेत दत्ताची भूमिका सुहास शिरसाट या अभिनेत्याने साकारली आहे. सुहास मुळचा बीडमधील असून त्याने 'जंगल मे मंगल', 'वाडा चिरेबंदी' या नाटकात काम केलं आहे. आम्ही सारे लेकुरवाळे ” या नाटकातील भूमिकेसाठी राज्य शासनाचा बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार पटकावला.
    • वच्छी – मालिकेतील वच्छी या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं आहे. अभिनेत्री संजीवनी पाटील ही भूमिका साकारत आहे. मालिकेमध्ये उत्तमपणे खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या वच्छीचा स्वभाव प्रत्यक्षात मात्र या व्यक्तीरेखेच्या विरुद्ध आहे.
    • गुरव- 'तो बघता हा..', या संवादाने घराघरात पोहोचलेला कलाकार म्हणजे मालिकेतील गुरव. ही भूमिका अनिल गावडे यांनी साकारली आहे.
    • छाया – नम्रता पावसकरने 'रात्रीस खेळ चाले 2' मध्ये छायाची भूमिका साकारली आहे.
    • सरिता- दत्ताची बायको म्हणजे सरिता. कोणालाही न घाबरता आपले विचार स्पष्टपणे मांडणारी सरिता या मालिकेतील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. ही भूमिका प्राजक्ता वाडयेने साकारली आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसली तरी फेसबुकवरील प्राजक्ताचे काही फोटो पाहून तिच्या मॉडर्न लूकचा अंदाज येतो.
    • पांडू- आपल्या वेड्या चाळ्याने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा पांडू म्हणजे प्रल्हाद कुडतरकर. प्रल्हादने पांडू या भूमिकेला उत्तमरित्या न्याय दिला आहे. प्रल्हाद केवळ अभिनेताच नाही तर तो एक उत्कृष्ट संवाद लेखक, दिग्दर्शकही आहे. 'आभास', 'एक बाकी एकाकी', 'का रे दुरावा' सारख्या मालिका, नाटकांमध्ये त्याने काम केलं आहे.

Web Title: Ratris khel chale 2 star cast real name ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.