श्रेयाचा जन्म हा पुण्यात एका मराठी कुटुंबात झाला. अनेकांच्या नकला करण्याचा बालपणीचा छंद तिला 'चला हवा येऊ द्या'पर्यंत घेऊन येईल याची कल्पनाच नव्हती. प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणणं या दोन्ही गोष्टी श्रेया बुगडे या प्रवासात शिकली. 'फू बाई फू'च्या गेस्ट एपिसोडसाठी श्रेयाला विचारण्यात आलं तेव्हा ती काहीशी साशंक होती. विनोद आणि विनोदनिर्मिती आपल्यासाठी नाही, आपल्याला ते जमणारच नाही, असंच तिला वाटत होतं. अभिनयाची खरी संधी ही 'फू बाई फू'च्या निमित्ताने मिळाली असं ती सांगते. डॉ. नीलेश साबळेच्या उत्तम मार्गदर्शनाखाली रोज नवे काहीतरी शिकायला मिळत असल्याचं ती सांगते. श्रेयाचे लग्न झाले असून निखिल सेठ असं तिच्या पतीचं नाव आहे. २०१५ मध्ये श्रेया व निखिलने प्रेमविवाह केला. श्रेया आणि निखिल यांची ओळख एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान झाली. मालिकेच्या शूटिंगदरम्यान निखिल अनेकवेळा श्रेयासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. पण मैत्री न होता, त्यांच्यात काही कारणांनी वादच होत होते. त्यानंतर निखिलनं एका मालिकेची निर्मिती केली. श्रेयानं त्याचं अभिनंदन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. तेव्हापासून या दोघांच्या नात्याची खरी सुरुवात केली. या दोघांमध्ये तेव्हा मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. निखिलनं श्रेयाला प्रपोज केलं. श्रेयाने तिच्या विनोदबुद्धीने जरी प्रेक्षकांचे मन जिंकले असले तरी 'समुद्र' या नाटकात ती गंभीर भूमिकेत दिसली. या नाटकातील तिच्या आणि चिन्मय मांडलेकरच्या भूमिकेचे नेहमीच कौतुक केले जाते. -
छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/श्रेया बुगडे
-
छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/श्रेया बुगडे
-
छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/श्रेया बुगडे
अनेकांच्या नकला करणाऱ्या श्रेया बुगडेच्या खासगी आयुष्याविषयी काही गोष्टी..
श्रेयाची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या कथेसारखीच आहे.
Web Title: Fu bai fu to chala hawa yeu dya shreya bugde journey and her personal life ssv