• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. coronavirus fan points out similarities between voldemort shaktimans tamraj its pretty interesting scsg

‘व्हॉल्डेमोर्ट’ आणि ‘तमराज किलवीश’मध्ये या सात गोष्टी आहेत समान, नेटकरीही झाले थक्क

या यादीमधील सहावी गोष्ट तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल

April 10, 2020 15:35 IST
Follow Us
  • करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने देशात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकाडाउनमुळे घरात बसलेल्या लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी डीडी नॅशनल वाहिनीवर ‘महाभारत’, ‘रमायण’, ‘ब्योमकेश बक्शी’ अशा सर्व लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या. या यादीत प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आता शक्तिमान या सुपरहिरोची देखील भर पडली आहे. एक एप्रिलपासून दररोज दुपारी एक वाजता डीडी नॅशनल वाहिनीवर शक्तिमान ही मालिका दाखवली जात आहे.
    1/11

    करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने देशात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकाडाउनमुळे घरात बसलेल्या लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी डीडी नॅशनल वाहिनीवर ‘महाभारत’, ‘रमायण’, ‘ब्योमकेश बक्शी’ अशा सर्व लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या. या यादीत प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आता शक्तिमान या सुपरहिरोची देखील भर पडली आहे. एक एप्रिलपासून दररोज दुपारी एक वाजता डीडी नॅशनल वाहिनीवर शक्तिमान ही मालिका दाखवली जात आहे.

  • 2/11

    शक्तिमान ही भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक गाजलेली मालिका आहे. आठवड्यातून केवळ एकदाच प्रदर्शित होणारी ही मालिका जवळपास १२ वर्ष टिव्हीवर सुरु होती. या मालिकेचा शेवटचा भाग २००५ साली पोगो वाहिनीवर प्रदर्शित झाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे अगदी शेवटच्या भागापर्यंत शक्तिमानच्या टीआरपीमध्ये घट झाली नाही. परंतु काही आर्थिक मतभेदांमुळे ही मालिका बंद करण्यात आली. मात्र लॉकडाउनच्या निमित्ताने शक्तिमान आता पुन्हा एकदा टीव्हीवर परतला आहे.

  • 3/11

    शक्तीमान पुन्हा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक मिम्सही नेटकऱ्यांनी शेअर केले आहेत. मात्र या सर्वामध्ये ट्विटवरील सागर (@sagarcasm) नावाच्या एका शक्तीमानच्या चाहत्याने जगप्रसिद्ध हॅरी पॉर्टर सिरीजमधील मुख्य व्हिलन व्हॉल्डेमोर्ट आणि शक्तीमनमधील प्रमुख व्हिलन असणाऱ्या तमराज किलवीशमधील सामन्य शोधली आहेत. या ट्विट थ्रेड खूप व्हायरल झाला आहे चला तर मग पाहूयात काय साम्य आहेत या दोघांमध्ये.

  • 4/11

    व्हॉल्डेमोर्टला त्याने केलेल्या वाईट कामांमुळे Dark Lord म्हणून ओळखलं जातं. तर तमराज किलवीशच्या नावातील तम या शब्दाचा अर्थ अंधार असा होतो. त्यामुळे तमराज म्हणजेच अंधाराचा बादशाह.

  • 5/11

    दोघांचाही अंत उडण्याची जादूई शक्ती असणाऱ्या व्यक्तीनेच केला.

  • 6/11

    व्हॉल्डेमोर्टने हॅरी पॉर्टरच्या पालकांना मारलं तर तमराज किलवीशने शक्तीमानच्या आई वडिलांना ठार केलं होतं.

  • 7/11

    व्हॉल्डेमोर्ट आणि तमराज किलवीश दोघांचीही आधीची नावं वेगळी होती. दोघेही वाईट मार्गावर जाण्याआधी एक उत्तम विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे.

  • 8/11

    व्हॉल्डेमोर्ट आणि हॅरी एकाच ठिकाणी शिकले. त्याचप्रमाणे शक्तीमान आणि तमराज किलवीश दोघांचे एकच गुरु होते.

  • 9/11

    व्हॉल्डेमोर्ट आणि तमराज किलवीश दोघेही १९९७ साली पहिल्यांदा जगासमोर आले.

  • 10/11

    व्हॉल्डेमोर्ट आणि तमराज किलवीश दोघांचेही चेहरे पांढरे होते. तसेच दोघांचेही नाक विचित्र होतं.

  • 11/11

    काय मग ही साम्य अगदी चक्रावून सोडणारी आहेत की नाही? तुम्हालाही काही साम्य आठवत असतील तर कमेंट करुन नक्की कळवा.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus fan points out similarities between voldemort shaktimans tamraj its pretty interesting scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.