-
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान यानं या जगाचा निरोप घेतला. त्याच्या एका चाहत्यानं त्याला अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूड आर्ट प्रोजेक्टच्या रणजीत दहिया यानं आपल्या कलेच्या माध्यमातून इरफान खानला श्रद्धांजली वाहिली. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या एका घराच्या भिंतीवर त्यानं इरफान खानचं चित्र साकारलं आहे. (सर्व फोटो – रणजीत दहिया, बॉलिवूड आर्ट प्रोजेक्ट)
-
आम्ही इरफानची वाट पाहत होतो. पण त्यानं जगाचा निरोप घेतला. तेव्हा मी माझ्या कलेच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहण्याचा निर्मय घेतला. लॉकडाउनमुळे फ्रेश वॉलवर चित्र साकारण्याची परवानगी मिळाली नाही म्हणून मी जुन्याच भिंतीवर हे चित्र साकारलं. जर तुम्ही त्याकडे पाहिलंतर तर इरफान तुमच्याचकडे पाहत असल्याचं तुम्हाला जाणवेल, असं रणजीत दहिया यानं सांगितलं.
-
हे चित्र साकारण्यासाठी त्याला तीन दिवसांचा कालावधी लागला.
-
हे चित्र साकारताना प्रामुख्यानं त्याच्या डोळ्यांवर लक्ष केंद्रित केलं. अनेक जण त्याच्या डोळ्यांचे चाहते होते, असं रणजीत दहियानं सांगितलं.
-
ज्या घराच्या भिंतीवर हे चित्र साकारण्यात आलं आहे ते डेव्हिड नावाच्या एका व्यक्तीचं आहे.
-
इरफान खानचं चित्र आपल्या घराच्या भिंतीवर साकारल्यानं त्यांचं कुटुंबही खुष आहे. आपल्या घराच्या भिंतीवर त्याचं चित्र साकारून त्याला श्रद्धांजली अर्पण केल्याचं ते म्हणतात.
-
२९ एप्रिल रोजी इरफान खानचं मुंबईत निधन झालं. त्याच्या अचानक जाण्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.
चाहत्याकडून इरफान खानला अनोखी श्रद्धांजली
Web Title: Fan giving tribute to bollywood actor irrfan khan did wall painting mumbai bandra jud