-

लॉकडाउनमुळे सर्वसामान्य लोकांसोबतच सेलिब्रिटी देखील त्रस्त झाले आहेत. (फोटो सौजन्य इनस्टाग्राम)
-
लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे अनेक मालिका बंद करण्यात आल्या आहेत. (फोटो सौजन्य इनस्टाग्राम)
-
परिणामी काही सेलिब्रिटींवर बेरोजगार होण्याची वेळ आली. अशीच काहीशी अवस्था अभिनेत्री आशी सिंहची झाली आहे. (फोटो सौजन्य इनस्टाग्राम)
-
'दिल जैसे धड़के धड़कने दो' ही मालिका निर्मात्यांनी बंद केली आहे. परिणामी आशी देखील आता बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहे. (फोटो सौजन्य इनस्टाग्राम)
-
स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत आशीने आपली नाराजी व्यक्त केली. (फोटो सौजन्य इनस्टाग्राम)
-
ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर सुरु होती. परंतु निर्मात्यांनी अचानक मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. यावर अभिनेत्री म्हणाली, (फोटो सौजन्य इनस्टाग्राम)
-
"दिल जैसे धड़के धड़कने दो हा प्रोजेक्ट बंद झाल्यामुळे मी खुप निराश झाली आहे. या मालिकेत आता माझी एंट्री होणार होती. काही भागांचे शूटींग देखील झाले होते." (फोटो सौजन्य इनस्टाग्राम)
-
"दिल जैसे धड़के धड़कने दो हा प्रोजेक्ट बंद झाल्यामुळे मी खुप निराश झाली आहे. या मालिकेत आता माझी एंट्री होणार होती. काही भागांचे शूटींग देखील झाले होते." (फोटो सौजन्य इनस्टाग्राम)
-
"परंतु माझी संपूर्ण मेहनत वाया गेली. या मालिकेचा विषय आवडल्यामुळे मी काम करण्यास होकार दिला होता. निर्मात्यांसोबत करार केल्यामुळे मला इतर कुठल्याही मालिकेत काम करता येणार नव्हते. मालिका बंद झाल्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न आता निर्माण झाला आहे." (फोटो सौजन्य इनस्टाग्राम)

आशी एक टीव्ही अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इनस्टाग्राम)
-
'क्राईम पेट्रोल'मध्ये लहान मोठ्या भूमिका करुन तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. (फोटो सौजन्य इनस्टाग्राम)
-
त्यानंतर 'गुमराह' आणि 'ये इन दिनों की बात है' या मालिकांमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य इनस्टाग्राम)
-
परंतु काही एपिसोडनंतर तिला या मालिकांमधून बाहेर करण्यात आले. (फोटो सौजन्य इनस्टाग्राम)
-
'दिल जैसे धड़के धड़कने दो' या मालिकेमधून ती पुन्हा एकदा कमबॅक करणार होती. परंतु तिला लोकप्रिय करण्याआधीच तिची कमबॅक मालिका बंद करण्यात आली. (फोटो सौजन्य इनस्टाग्राम)
करोनामुळे अभिनेत्री झाली बेरोजगार; कमबॅक करण्याआधीच मालिका बंद
बेरोजगारीची कुऱ्हाड आता कलाश्रेत्राही
Web Title: Ashi singh tv serial dil jaise dhadke dhadakne do off air mppg