
साखरपुडा, लग्न हे सोहळे प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतात. या खास सोहळ्यांसाठी साजश्रृंगारसुद्धा तसाच केला जातो. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) २ फेब्रुवारी रोजी कुणाल बेनोडेकरशी सोनालीचा दुबईत साखरपुडा पार पडला. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) या साखरपुड्यासाठी सोनालीने केलेला साजश्रृंगार..(छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) कुठल्याही सिनेमासाठी, जाहिरातीसाठी नाही, कार्यक्रमासाठी नाही तर हा श्रृंगार आहे माझ्या साखरपुड्यासाठी.. असं कॅप्शन देत सोनालीने हे फोटो पोस्ट केले आहेत. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) कांजीवरम साडी, पारंपरिक दागिने, केसात माळलेला गजरा यांमध्ये सोनालीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) साखरपुड्यासाठी सोनालीने पारंपरिक लूकलाच पसंती दिली. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) सोनालीचा होणारा नवरा कुणाल हा कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) त्यामुळे लग्नानंतर सोनालीसुद्धा दुबईत राहणार का, असा प्रश्न अनेक चाहत्यांनी तिला विचारला आहे. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) वाढदिवसानिमित्त सोनालीने तिच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि सोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी) सोनाली सध्या कुणालसोबत दुबईतच आहे. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सोनाली कुलकर्णी)
कांजीवरम साडी, पारंपरिक दागिने.. साखरपुड्यासाठी सोनालीचा असा साजश्रृंगार
कुठल्याही सिनेमासाठी, जाहिरातीसाठी नाही, कार्यक्रमासाठी नाही तर हा श्रृंगार आहे माझ्या साखरपुड्यासाठी.. असं कॅप्शन देत सोनालीने हे फोटो पोस्ट केले आहेत.
Web Title: Sonalee kulkarni engagement photos kanjivaram saree and traditional jewelry ssv