-
गेल्या काही काळी काळापासून हिंदुस्तानी भाऊ हा सोशल मीडियावर लोकप्रिय ठरला आहे. आज जाणून घेऊ त्याच्याबद्दल काही विशेष गोष्टी. (सर्व फोटो – युट्यूब, इन्स्टाग्राम)
-
हिंदुस्तानी भाऊ हे नाव सोशल मीडियावर फारचं चर्चेत असंत. सध्या हे नाव काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
-
बिग बॉसच्या १३ व्या सिजनपासून हिदुस्तानी भाऊनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं. आज तो युट्यूब आणि आपल्या व्हिडीओद्वारे सर्वांच्याच परिचयाचा असला तरी त्याचं जीवन मात्र संघर्षमय होतं.
-
काही दिवसांपूर्वी त्यानं एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या वेब सिरिजविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली होती.
-
हिंदुस्तानी भाऊचं खरं नाव विकास जयराम पाठक असं आहे. हिंदुस्तानी भाऊनं सोशल मीडिया सेन्सेशन बनण्यापूर्वी आपल्या जीवनात अनेक चढउतार पाहिले आहेत.
-
तो लहान असतानाच त्याच्या वडिलांची नोकरी गेल्यामुळं त्याच्यावर घराची जबाबदारी होती. ७ वी मध्ये असताना त्यानं आपलं शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबाची जबाबदारी उचलली.
-
सुरुवातीच्या काळात त्यानं टेनिस कोर्टवर बॉल उचलण्यापासू ते घरोघरी जाऊन अगरबत्ती विकण्यापर्यंत, तसंच वेटरचही काम केलं. त्यानं एका मुलाखतीदरम्यान या बाबींचा उलगडा केला.
-
दरम्यान, काही काळानंतर त्यांनं एक स्थानिक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कामही केलं. या ठिकाणी त्याच्याकडे क्राईम बिट सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
-
हिंदुस्तानी भाऊ हा सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय असला तरी पाकिस्तानविरोधातील त्याचे व्हिडीओदेखील सर्वांच्या पसंतीस उतरले आहेत.
-
'पहली फुर्सत से निकल' हा त्याचा डायलॉग सर्वांच्याच पसंतीस उतरला होता.
-
हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठकचा एक मुलगादेखील आहे. तो त्याच्या नावानं एक एनजीओदेखील चालवतो.
-
हिंदुस्तानी भाऊनं एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर एक व्हिडीओदेखील शेअर केला होता.
-
त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांच्यावर टीकाही केली होती.
-
२०१४ मध्ये त्यानं एक युट्यूब चॅनल सुरू केलं होतं. त्यावर संजय दत्त याची केलेली मिमिक्री सर्वांनाच आवडली होती. तसंच पाकिस्तानविरोधातील त्याचे व्हिडीओ सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत असतात.
-
तो मिम्सच्या दुनियेतही फार लोकप्रिय आहे. त्याच्यावरील अनेक मिम्स व्हायरल होत असतात.
-
हिंदुस्तानी भाऊचे युट्यूबवर तब्बल साडेपाच लाखांच्या जवळपास सबस्क्रायबर्स आहेत. याद्वारे तो कमाई करत असतो.
संघर्षमय जीवन ते हिंदुस्तानी भाऊ; जाणून घ्या त्याचा इथपर्यंतचा प्रवास
Web Title: Know more about vikas pathak aka hindustani bhau youtuber social media sensation facebook instagram photos ekta kapoor alt balaji jud