-
मनोरंजन सृष्टीमधील घराणेशाहीचा वाद काही नवा नाही. मात्र या घराणेशाहीच्या प्रवाहाविरोधात जात मनोरंजन सृष्टीमध्ये मोठे झालेले अनेक कलाकार आहेत. मग अगदी इंग्रजी असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अगदी शून्यातून सुरुवात करुन प्रसिद्धीचा डोलारा उभा करणारे अनेक सेलिब्रिटी आहे. यापैकी अनेकजण तर सुरुवातील काय काम करायचे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. आज आपण अशाच काही सेलिब्रिटींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी मनोरंजन सृष्टीमध्ये पदार्पण करण्याआधी वेगवेगळी काम केली आहे. चला तर मग पाहूयात काय होते या लोकप्रिय सेलिब्रिटींचे पहिले जॉब…
-
अभिनेता अक्षय कुमार हा चित्रपटांमध्ये काम करण्याआधी हाँगकाँगमध्ये शेफ आणि वेटरचे काम करायचा.
-
रणवीर सिंग हा एका जाहिरात कंपनीसाठी कॉपी रायटर म्हणून काम करायचा.
-
अमिताभ बच्चन यांना मनोरंजन सृष्टीमध्ये त्यांच्या आवाजासाठी ओळखलं जातं. मात्र याचा आवाजामुळे त्यांना ऑल इंडिया रेडिओने नोकरीसाठी नकार दिला होता.
-
अर्शद वारसी हा चित्रपट क्षेत्रामध्ये येण्याआधी दारोदारी जाऊन कॉसमॅटिक्स म्हणजेच पावडर, तेल आणि मेकअपचे सामानवगैरे विकायचा.
-
बोमन इराणी हे चित्रपट सृष्टीमध्ये येण्याआधी मुंबईतील एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचे.
-
ब्रिटीश राजघराण्याचे धाकटे युवराज हॅरीसोबत विवाहबंधनात अडकलेली हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कलही मनोरंजन सृष्टीमध्ये येण्याआधी लग्नाची आमंत्रणे लिहिण्याचे काम करायची.
-
वेगळ्या भूमिकांसाठी ओळखलं जाणारं आणखीन एक नाव म्हणजे रणदीप हुड्डा. रणदीप आधी वेटर म्हणून काम करायचा.
-
ब्रॅड पीटने चित्रपटांमध्ये काम करण्याआधी एका हॉटेलमध्ये काम केलं होतं. मॉलमध्ये मोठे बाहुले असतात त्याप्रमाणे चीकन पपेट बनून तो ग्राहकांना आकर्षित करण्याचं काम करायचा.
-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी दिल्लीमध्ये वॉचमन म्हणून काम करायचा.
-
आर माधवन मनोरंजन क्षेत्रात येण्याआधी संवाद आणि सार्वजनिक ठिकाणी कसे बोलावे यासंदर्भातील लेक्चर्स घ्यायचा.
-
जॉनी डीप हा सुरुवातील पेन विक्री करुन आपलं पोट भरायचा. आज तो हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
जॉनी लिवर यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याआधी पोटापाण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर फिरुन पेन विकण्याचं काम केलं आहे.
-
इटस्टेलर फेम मॅथ्यू मिकॉनघी हा चित्रपटांमध्ये काम करण्याआधी ऑस्ट्रेलियामध्ये कापलेल्या चिकनचे तुकडे साफ करण्याचं काम करायचा.
-
आपल्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. तापसी मनोरंजन क्षेत्रात येण्याआधी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करायची. तीने एक अॅप डेव्हलप केलं आहे.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याआधी बेंगळुरु शहरामध्ये बस कंडक्टरचे काम केलं होतं.
-
हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टॉम क्रुज हा अभिनय क्षेत्रामध्ये येण्याआधी हॉटेलमध्ये काम करायचा. आलेल्या पाहुण्यांचे सामान वाहून नेण्याचं काम टॉम करायचा.
-
टॉम हँक यांनी मनोरंजन क्षेत्रात येण्याआधी फुटबॉलच्या मैदानावर पॉपकॉर्न आणि शेंगा विकण्याचं काम केलं आहे.
-
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. जॅकलिन मूळची श्रीलंकन आहेत. मनोरंजन क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याआधी ती श्रीलंकेमधील एका वृत्तपत्रामध्ये रिपोर्टर म्हणून काम करायची.
-
ख्रिस प्रॅट हा आधी स्ट्रीपर म्हणून काम करायचा.
-
पॉर्न चित्रपटांच्या सेटवर सेट ड्रेसर म्हणून काम करणारा जॉन हॅम हा आज हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे.
कोणी पेन विक्रेता तर कोणी पॉर्न सेटवरील कर्मचारी; जाणून घ्या कलाकारांचे First Job
अभिनेत्री तापसी पन्नू पासून ते ब्रॅड पीटपर्यंत २० कलाकारांच आधी काय काम करायचे जाणून घ्या
Web Title: The first jobs of celebrities before they became superstars scsg