-
लॉकडानमुळे फक्त सर्वसामान्याच नाही तर अनेक सेलिब्रेटीही आपल्या घरात अडकले होते. (फोटो – इंडिया टुडे)
-
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी चित्रपटांचं शुटिंगदेखील बंद असल्याने सेलिब्रेटी घऱातच वेळ घालवत आहेत. (फोटो – इंडिया टुडे)
-
त्यामुळे लॉकडाउन शिथील होताच सैफ अली खान आणि करिना तैमूरला घेऊन घराबाहेर पडल्याचं दिसलं. (फोटो – इंडिया टुडे)
-
सैफ अली खान आणि करिना गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत आपल्या घरात अडकले होते. (फोटो – इंडिया टुडे)
-
सैफ आणि करिना तैमूरला घेऊन मरिन ड्राइव्हला पोहोचले होते. (फोटो – इंडिया टुडे)
-
मरिन ड्राइव्हवर दोघेही इतरांप्रमाणे बिनधास्त फिरत होते.
-
पण यावेळी दोघांनीही मास्क घातला नसल्याने ट्रोल होण्याची वेळ त्यांच्यावर आली.
-
दोघांनाही मरिन ड्राइव्हवर पोलिसांनी रोखलं आणि तैमूरला मास्क न घातल्याबद्दल अडवलं.
-
पोलिसांनी दोघांनाही लहान मुलांना बाहेर आणण्यास परवानगी नाही सांगतात दोघे घऱी परतले. (फोटो – इंडिया टुडे)
-
सुरक्षेच्या नियमांचं पालन न केल्याने सैफ आणि करिनावर टीका होत आहे. (फोटो – इंडिया टुडे)
-
लॉकडाउनदरम्यान करिना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून फोटो शेअर करत असते. (फोटो – इंडिया टुडे)
-
पण घराबाहेर पडलेल्या करिना-सैफला जास्त वेळ बाहेर फिरता आलं नाही आणि पुन्हा एकदा घऱी परतावं लागलं. (फोटो – इंडिया टुडे)
लॉकडाउन शिथील होताच सैफ-करिना तैमूरसोबत पोहोचले मरिन ड्राइव्हवर
लॉकडाउन शिथील झाल्याने अनेक सेलिब्रेटी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडत आहेत.
Web Title: Bollywood couple saif ali khan and kareena with taimur at marine drive sgy