-
कंगना रणौत बॉलिवूडमधली क्वीन म्हणून ओळखली जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ( सर्व फोटो – टीम कंगना रणौत, इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडमधील क्वीन सोबतच तिला फॅशन क्वीन म्हणूनही ओळखलं जातं. ती सोशल मीडियावरही फार अॅक्टिव्ह असते.
-
निरनिराळ्या पेहरावातले ती आपले फोटो कायम सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या साडीमधील फोटोंना तर अनेक चाहत्यांची पसंती मिळाली होती.
-
तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवर भारतीय पेहरावातले काही फोटो शेअर केले आहेत. यात ती निरनिराळ्या रंगांच्या पारंपारिक पोषाखात दिसत आहे.
-
तिचे हे पारंपारिक पोषाखातील फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस आले आहेत.
-
तिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि शेअर्सदेखील मिळाले आहेत.
-
तिनं आपली बहिण रंगोल चंडेलसाठी तिच्या स्वप्नातलं घर साकारलं आहे. त्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती.
-
सध्या रंगोली आणि कंगना मनालीमध्ये त्यांच्या घरी आहेत. लॉकडाउन सुरु होण्यापूर्वीच या दोघी बहिणी मनालीसाठी रवाना झाल्या होत्या.
-
विशेष म्हणजे या लॉकडाउनच्या काळात कंगना घरी राहून नवनवीन गोष्टी शिकत आहे.
-
अलिकडेच तिने रंगोलीच्या नवीन घराचं इंटेरिअरसुद्धा केलं आहे.
फॅशनचीही ‘क्वीन’… कंगना देते भारतीय पेहरावाला प्राधान्य
Web Title: Kangana ranaut is the queen of ethnic ensemble instagram social media photos jud