• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood items auctioned at exorbitant prices scsg

सनीची लाँजरी, सलमानचा टॉवेल, ‘लगान’मधील बॅट… ‘या’ सात वस्तूंच्या लिलावाची किंमत जाणून व्हाल थक्क!

जाणून घ्या चित्रपटांमधील या लहान लहान वस्तू किती मोठी रक्कम मोजून विकत घेतल्या जातात

June 13, 2020 18:59 IST
Follow Us
  • एक चित्रपट बनवण्यासाठी काय लागतं असं विचारल्यास तुम्ही म्हणाल कथा आणि चांगला अभिनेता. मात्र त्याचबरोबर चित्रपट बनवण्यासाठी अनेक लहानमोठ्या गोष्टी लागतात. म्हणजे अगदी भव्य दिव्य सेट्सपासून ते कपड्यांपर्यंत अनेक गोष्टींची चित्रपट निर्माण करताना काळजी घ्यावी लागते. यापैकी बऱ्याच गोष्टींना नंतर चाहत्यांकडून मोठी मागणी असते. अनेकदा एखाद्या चित्रपटामध्ये वापरण्यात आलेल्या खास गोष्टींचा लिलाव केला जातो. मग हा लिलाव एखाद्या समाजिक उपक्रमासाठी केला जातो किंवा कोणाला तरी मदत करण्यासाठी केला जातो. या वस्तूंच्या लिलाव करुन मिळणारा पैसा अनेकदा समाजिक कार्यासाठी किंवा गरजुंसाठीच वापरला जातो. त्यामुळेच अशा लिलावामध्ये अगदी यासाठी एवढी काय किंमत मोजायची असं वाटू शकतं एवढी किंमत मोजली जाते. या गॅलरीमध्ये आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.
    1/15

    एक चित्रपट बनवण्यासाठी काय लागतं असं विचारल्यास तुम्ही म्हणाल कथा आणि चांगला अभिनेता. मात्र त्याचबरोबर चित्रपट बनवण्यासाठी अनेक लहानमोठ्या गोष्टी लागतात. म्हणजे अगदी भव्य दिव्य सेट्सपासून ते कपड्यांपर्यंत अनेक गोष्टींची चित्रपट निर्माण करताना काळजी घ्यावी लागते. यापैकी बऱ्याच गोष्टींना नंतर चाहत्यांकडून मोठी मागणी असते. अनेकदा एखाद्या चित्रपटामध्ये वापरण्यात आलेल्या खास गोष्टींचा लिलाव केला जातो. मग हा लिलाव एखाद्या समाजिक उपक्रमासाठी केला जातो किंवा कोणाला तरी मदत करण्यासाठी केला जातो. या वस्तूंच्या लिलाव करुन मिळणारा पैसा अनेकदा समाजिक कार्यासाठी किंवा गरजुंसाठीच वापरला जातो. त्यामुळेच अशा लिलावामध्ये अगदी यासाठी एवढी काय किंमत मोजायची असं वाटू शकतं एवढी किंमत मोजली जाते. या गॅलरीमध्ये आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

  • 2/15

    याहू… चाहे कोई मुझे जंगली कहे… प्रेमाची अशी बेफाम आणि बेभान कबूली देणारी व्यक्ती म्हणजे शम्मी कपूर. ‘जंगली’ ( १९६१) हा तिचा पहिलाच चित्रपट होता. सायरा बानूबरोबरच्या या चित्रपटामधून शमी कपूर यांनी चित्रपट सृष्टीमध्ये जोरदार एन्ट्री घेतली.

  • 3/15

    याहू… चाहे कोई मुझे जंगली कहे… या गाण्यामध्ये शमी कपूर यांनी वापरलेल्या चॉकलेटी रंगाच्या कोटचाही लिलाव करण्यात आला होता. या कोटला त्या काळामध्ये ८० हजारांची बोली लावत विकत घेण्यात आला.

  • 4/15

    बॉलिवूडला आणि आमिरच्या करिअरलाही एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा ‘लगान’ चित्रपट २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला सर्वोत्तम परदेशी भाषेच्या चित्रपटासाठी अॅकॅडमी अवॉर्डचं मानांकनही मिळालं होतं. या चित्रपटाचं जगभरातून कौतुक झालं. विशेष म्हणजे आमिरनं साकारलेला भुवन आजही अनेकांच्या लक्षात आहे.

  • 5/15

    गावाकडे सारा भरायला पैसे नसतात, गावात दृष्काळ पडलेला असतो अशावेळी गावातील लोक ब्रिटीशांशी क्रिकेट खेळण्याची पैज लावतात. जर गावकरी खेळात जिंकले तर ब्रिटीश सारा माफ करतील अशी अट असते. असे कथानक असणाऱ्या चित्रपटामध्ये आमिरच्या नेतृत्वाखाली गावातील संघ ब्रिटिशांना पराभूत करतो. याच चित्रपटामध्ये आमिरने जी बॅट वापरली तिचा लिलाव करण्यात आला तेव्हा ही बॅट एक लाख ५६ हजार रुपयांनी विकली गेली. हे पैसे एका चॅरिटेबल ट्रस्टसाठी वापरण्यात आले. (Photo: Aamir Khan Productions)

  • 6/15

    'मुझसे शादी करोगी' या चित्रपटामध्ये सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा असा लव्ह ट्रँगल पहायला मिळाला होता. प्रियंकाला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी अक्षय आणि सलमानमध्ये सुरु असणारी चढाओढ प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. या चित्रपटामधील सर्वच गाणी त्यावेळी चांगलीच गाजलेली.

  • 7/15

    'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील टायटल ट्रॅकमध्ये समुद्रकिनारी सलमानने केलेली टॉवेल स्टेप तर इतकी लोकप्रिय झाली होती की पुढील अनेक वर्ष ती अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींनी ट्राय करुन बघतली होती. मात्र खूपच कमी लोकांना ठावूक असेल की या टॉवेल स्टेपसाठी सलमानने वापरलेल्या टॉवेलला लिलावामध्ये लाखो रुपयांची बोली लागली. अखेर एक लाख ४२ हजार रुपयांना सलमानने वापरलेल्या या टॉवेलचा लिलाव करण्यात आला. या निधीचा वापर एका सेवाभावी संस्थेसाठी करण्यात आला.

  • 8/15

    शाहरूख खानचा अभिनय, माधुरीची ‘मार डाला’ गाण्यातील दिलखेचक अदाकारी, ऐश्वर्या राय बच्चनचे अप्रितम सौंदर्य आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा स्पेशल टच या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असा ‘देवदास’ चित्रपट २००२ मध्ये खूप गाजला होता. या चित्रपटातील अनेक गाणी आजही अनेकांची फेव्हरेट आहेत.

  • 9/15

    देवदास चित्रपटातील मार डाला हे गाणे आजही अनेकांच्या आवडत्या गाण्यापैकी एक आहे. माधुरीने या गाण्यामध्ये वापरलेल्या लेहंग्याचाही लिलाव करण्यात आला. त्यावेळी या लेहंग्यासाठी तब्बल तीन कोटी रुपयांची बोली लावत तो विकत घेण्यात आला.

  • 10/15

    खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या भन्नाट भूमिकांबरोबरच चांगल्या कामांसाठी ओळखला जातो. अनेकजण त्याचं कौतुक आणि समाजकार्य बघून त्याला देवमाणूस म्हणत असल्याचेही सोशल मिडियावरील कमेंट बॉक्समध्ये दिसून येतं. मात्र अक्षयने ‘ओ माय गॉड’ या चित्रपटामध्ये देवाची म्हणजेच भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती.

  • 11/15

    अक्षय कुमारने ‘ओ माय गॉड’ या चित्रपटामध्ये घातलेला कोटचा १५ लाखांना लिलाव करण्यात आला. हे पैसे मुक्तांगण या लहान मुलांसंदर्भातील काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेला देण्यात आले होते. यासंदर्भात अक्षयनेच ट्विटवरुन सांगितलं होतं आणि या संस्थेला मदत करण्याचेही आवाहन केलं होतं.

  • 12/15

    शाहरुख खानचे चाहते आणि त्यांचे त्यांच्या लाडक्या अभिनेत्यावर असणारे प्रेम याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. अशाच एका चाहत्याने शाहरुखला भेट केलेल्या चित्राचा त्याने लिलाव केला होता. बॉलीवूडच्या जगात अनोख्या माहिती बरोबरच या चित्रामध्ये फ्रान्ससमधील कॉन्कोर्ड, आयफेल टॉवर इत्यादींचा समावेश आहे.

  • 13/15

    'ओसियन्स द ग्रेटेस्ट इंडियन शो' मध्ये ही कलाकृती लिलावासाठी ठेवण्यात झाली होती. या चित्राची किमान किंमत दोन लाख रुपये इतकी ठेवण्यात आलेली. हे चित्र हॅरी मीट सेजल या चित्रपटाच्या प्रदर्शनच्या काळात विक्रीसाठी ठेवण्यात आलं होतं. (Photo: Twitter/Iamsrk)

  • 14/15

    आपल्या मादक अदांसाठी लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सनीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक बोल्ड चित्रपट केले. यापैकीच एक होता ‘जिस्म २’ या चित्रपटाच्या पोस्टपासूनच या चित्रपटाची चिर्चा सुरु झाली होती.

  • 15/15

    ‘जिस्म २’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाल्यानंतर दिग्दर्शिका पूजा भट्ट हिने चित्रपटात सनीने वापरलेली अंतर्वस्त्रं (लाँजरी) लिलाव करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र सनीने याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र या वस्तुंचा ऑनलाइन लिलाव करुन त्या माध्यमातून जमा झालेली रक्कम पेटा या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मदत म्हणून देण्यात आली. सनीबरोबरच चित्रपटातील इतर कलाकारांनी वापरलेल्या कपड्यांचाही लिलाव करण्यात आला होता. या गोष्टींचा किती रक्कमेमध्ये लिलाव करण्यात आला होता यासंदर्भातील खुलासा कऱण्यात आला नाही.

Web Title: Bollywood items auctioned at exorbitant prices scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.