-
‘काइ पो चे’, 'छिछोरो', 'एम एस धोनी' या चित्रपटात दमदार भूमिका साकारणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
-
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने 'किस देस में है मेरा दिल' या मालिकेत काम केले. त्यानंतर त्याने 'पवित्र रिश्ता' या मालिकेत काम केले. या मालिकेतील मानव हे पात्र विशेष गाजले.
-
त्यानंतर २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
सुरुवातील सुशांत मालाडमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे म्हटले जाते.
-
२०१५मध्ये त्याने पाली हिल येथे एक पेंटहाउस खरेदी केल्याच्या चर्चा होत्या. त्याच्या या पेंटहाउसची किंमत २० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. सुशांतने घरातील प्रत्येक कोपरा डिझायइनकडे लक्ष दिले असल्याचे देखील म्हटले जाते.
-
सुशांतच्या कार कलेक्शनमध्ये मसेराटी क्वाट्रोपोर्टो (Maserati Quattroporte) ही कार आहे. या कारची किंमत १.५ कोटी रुपये आहे.
-
तसेच त्याच्याकडे Land Rover Range Rover SUV ही कार देखील होती.
-
तसेच त्याच्याकडे बीएमडब्ल्यू K1300R बाइक होती. या बाइकची किंमत २५ लाख रुपये आहे.
-
सुशांतला नेहमी चंद्र, ग्रह पाहण्याची विशेष आवड होती. त्यासाठी त्याने अडवान्स टेलिस्कोप 14″ LX600 खरेदी केला होता.
-
हा सर्वात अडावान्स टेलिस्कोप होता.
-
सुशांतने २०१८मध्ये चंद्रावर जमीन खरेदी केली होती. चंद्रावर जमिन खरेदी करणारा सुशांत हा पहिला बॉलिवूड अभिनेता होता.
-
सुशांत एका चित्रपटासाठी जवळपास ५ ते ७ कोटी मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
तो जाहिरांतीमध्ये देखील काम करताना दिसत होता.
महागड्या गाड्या ते चंद्रावर जमीन.. जाणून घ्या सुशांत सिंह राजपूतच्या संपत्तीबद्दल
Web Title: Sushant singh rajput property and net worth actor owned land on moon avb