• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about singer marathi actress aarya ambekar dmp

PHOTOS: ‘हॅप्पी बर्थ डे आर्या’, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ ते ‘ती सध्या काय करते’

June 16, 2020 19:02 IST
Follow Us
  • गायिका ते अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या आर्या आंबेकरचा आज वाढदिवस आहे. झी मराठीवर २००८ मध्ये रंगलेल्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शोने आर्या आंबेकरला ओळख मिळवून दिली. (सर्व फोटो सौजन्य - आर्या आंबेकर इन्स्टाग्राम)
    1/15

    गायिका ते अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या आर्या आंबेकरचा आज वाढदिवस आहे. झी मराठीवर २००८ मध्ये रंगलेल्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शोने आर्या आंबेकरला ओळख मिळवून दिली. (सर्व फोटो सौजन्य – आर्या आंबेकर इन्स्टाग्राम)

  • 2/15

    मूळची नागपूरची असलेली आर्या गायनामध्ये यशस्वी झाल्यानंतर तिने अभिनयातही नशीब आजमावले.

  • 3/15

    आर्या जरी गायनात हुषार असली तरी भविष्यात ती अभिनेत्री होणार याची चुणूक ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’मध्येच पाहायला मिळाली होती.

  • 4/15

    छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचं शीर्षक गीतही आर्यानेच गायलं आहे.

  • 5/15

    आर्याचा जन्म नागपूरमध्ये समीर आणि श्रुती आंबेकर या मराठी दांपत्याच्या घरी झाला. आर्याचे वडील समीर हे डॉक्टर असून आई श्रुती गायिका आहे. आर्याने आपल्या आईकडून गायनाचे धडे घेतले.

  • 6/15

    आर्याची आजीसुद्धा एक शास्त्रीय गायिका आहे. तिने आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले.

  • 7/15

    आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली.

  • 8/15

    २०१७ च्या सुरवातीस प्रदर्शित झालेल्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून तिने अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली.

  • 9/15

    'ती सध्या काय करते' या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

  • 10/15

    तिसरीत असताना आर्याने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले पारितोषिक मिळवून दिले.

  • 11/15

    आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत.

  • 12/15

    लेटस गो बॅक, बालगंधर्व, रमा माधव तसेच आणखी काही चित्रपटांसाठी आर्याने पार्श्वगायन केले आहे.

  • 13/15

    सुवासीनी, दिल दोस्ती दुनियादारी, तुला पाहते रे, जिवलगा या मालिकांसाठी आर्याने गाणी गायली आहेत.

  • 14/15

    माणिक वर्मा शिष्यवृत्ती, डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार, मोस्ट नॅचरल परफॉरमन्स ऑफ द इअर, सूर ज्योत्सना राष्ट्रीय संगीत अशा मानाच्या पुरस्काराने आर्याला सन्मानित करण्यात आले आहे.

  • 15/15

    आर्या आज यशस्वी गायिका आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Web Title: Know about singer marathi actress aarya ambekar dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.