'दिल दोस्ती दुनियादारी' आणि 'दिल दोस्ती दोबारा' या मालिकांमध्ये झळकलेली सुखी आणि सुव्रतची जोडी फारच प्रसिद्ध आहे. सखी गोखले आणि सुव्रत जोशीने नुकतंच लग्न केलं. झी मराठीवरच्या जय मल्हार आणि काहे दिया परदेस या दोन मालिका आठवत आहेत का? जय मल्हार मालिकेतली इशा केसकर व काहे दिया परदेसमधला ऋषी सक्सेना एकमेकांना डेट करत आहेत. मराठीतील लोकप्रिय जोडी.. प्रिया बापट आणि उमेश कामत. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०११ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे ही मराठीतली आणखी एक चर्चेतली जोडी. २२ डिसेंबर २०११ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. उर्मिलाला पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला होता. -
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील सन्नी दा अर्थात अभिनेता राज हंचनाळे याने मनीषा ऊर्फ मॉली डेस्वाल हिच्याशी लग्नगाठ बांधली. राज आणि मॉली यांचं लव्ह मॅरेज असून जवळपास सहा वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात.
मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नुकताच दुबईत साखरपुडा पार पडला. कुणाल बेनोडेकर असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव असून ते लवकरच लग्न करणार आहेत. अभिनेता शशांक केतकर व त्याची पत्नी प्रियांका ढवळे रश्मी अनपट आणि अमित खेडेकर यांनी डिसेंबर २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली. एका नाटकाच्या तालीमदरम्यान दोघांची भेट झाली आणि ते प्रेमात पडले. मयुरी वाघ व पियुष रानडे यांनी १ फेब्रुवारी २०१७ रोजी लग्न केलं. 'अस्मिता' या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं. याच मालिकेदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांनी २०१६ मध्ये लग्न केलं. या दोघांनी एकाच चित्रपटात काम केलं होतं आणि त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेमाचं अंकुर फुललं.
मराठी सेलिब्रिटी कपल्सचा रोमँटिक अंदाज
पाहा फोटो
Web Title: Take a look at the romantic pictures of marathi celebrity couples ssv