-
आर्या आंबेकर… आठवतेय ना… तो लोभस मनमोहक चेहरा… सध्या ती काय करते आणि सारेगमप लिटील चॅम्प्स या स्पर्धेची विजेती…आर्या आंबेकरने नुकतेच २७ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.
-
आर्या आपल्या चाहत्यांसाठी दररोज सोशल मीडियावर फोटो अपलोड करत असते..
-
त्यातीलच निवडक साडीमधील फोटो आज आम्ही देत आहेत..
आर्याने साडीमधील अपलोड केलेल्या फोटोंच्या प्रेमात तुम्ही नक्कीच पडाल… साडीमध्ये आर्याचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. आर्याचा जन्म नागपूरमध्ये समीर आणि श्रुती आंबेकर या मराठी दांपत्याच्या घरी झाला. आर्याचे वडील समीर हे डॉक्टर असून आई श्रुती गायिका आहे. आर्याने आपल्या आईकडून गायनाचे धडे घेतले. आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली. २०१७ च्या सुरवातीस प्रदर्शित झालेल्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून तिने अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. लेटस गो बॅक, बालगंधर्व, रमा माधव तसेच आणखी काही चित्रपटांसाठी आर्याने पार्श्वगायन केले आहे. सुवासीनी, दिल दोस्ती दुनियादारी, तुला पाहते रे, जिवलगा या मालिकांसाठी आर्याने गाणी गायली आहेत. (सर्व फोटो आर्या आंबेकर इन्स्टाग्राम)
मनमोहक! आर्या आंबेकरचे साडीतील फोटो पाहून प्रेमात पडाल…
Web Title: Arya ambekar saree photo nck