• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about singham actress kajal aggarwal who got into films by chance dmp

PHOTOS: नशिबाने मिळालेल्या संधीचं सोनं केलं, ‘सिंघम’मधल्या काजल अग्रवालची गोष्ट

June 19, 2020 17:34 IST
Follow Us
  • अभिनेत्री काजल अग्रवालचा आज वाढदिवस आहे. १९ जून १९८५ रोजी काजलचा जन्म झाला. दक्षिणेतून आलेली हिरॉईन आज पूर्णपणे मुंबईकर आहे. ( सर्व फोटो सौजन्य - काजल अग्रवाल इन्स्टाग्राम)
    1/15

    अभिनेत्री काजल अग्रवालचा आज वाढदिवस आहे. १९ जून १९८५ रोजी काजलचा जन्म झाला. दक्षिणेतून आलेली हिरॉईन आज पूर्णपणे मुंबईकर आहे. ( सर्व फोटो सौजन्य – काजल अग्रवाल इन्स्टाग्राम)

  • 2/15

    मुंबई स्थित पंजाबी कुटुंबात जन्मलेली काजोल इथेच लहानाची मोठी झाली. काजलचे वडिल विनय अग्रवाल कपडा व्यावसायिक तर आई सुमन मिठाईच्या व्यवसायात आहे.

  • 3/15

    काजलला चित्रपटसृष्टीत यश मिळाल्यानंतर आता तिची आईचं तिच्यासाठी मॅनेजरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडते.

  • 4/15

    काजलने कुलाब्यातील एका कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर जय हिंद कॉलेजची ती विद्यार्थिनी होती. पुढे केसी कॉलेजमधून तिने मास मीडियामध्ये डिग्री मिळवली.

  • 5/15

    कॉलेजमध्ये असताना तिने इंग्लिश आणि हिंदी नाटकांमध्ये काम केले आहे.

  • 6/15

    "चित्रपटात मला नशिबाने काम करण्याची संधी मिळाली. मी बीएमएमच्या शेवटच्या वर्षाला होते आणि एका कंपनीमध्ये इंटर्नशिप करत होते. त्यावेळी मला तामिळ आणि तेलगू चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली" असे तिने काही वर्षांपूर्वी मिड डे शी बोलताना सांगितले.

  • 7/15

    काजलला एमबीए करायचे होते. पण चित्रपटात संधी मिळतेय तर काम करुन बघावं म्हणून तिने हा चित्रपट स्वीकारला. पण त्यानंतर तिने मागे वळून बघितले नाही. मी आज चित्रपट सृष्टीचा भाग आहे याचे मला समाधान असल्याचे तिने सांगितले.

  • 8/15

    "मला कोणी गॉडफादर नाहीय. पण इथे प्रत्येकाने एवढी मदत केली की, मला गॉडफादरची आवश्यकता भासली नाही" असे काजलने सांगितले.

  • 9/15

    'लक्ष्मी कल्याणम' या तेलगू चित्रपटातून तिने प्रमुख भूमिकेतून डेब्यु केला. त्याआधी ऐश्वर्या राय आणि विविक ओबेरॉय यांच्या 'क्यु हो गया ना' या चित्रपटात काम केले आहे. ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका तिने केली होती. त्यावेळी काजल फक्त १९ वर्षांची होती.

  • 10/15

    २००७ साली तेलगु चित्रपटसृष्टीतून काजलचे करिअर सुरु झाले. लक्ष्मी कल्याणमनंतर तिने चंदामामा, आतादिसता, मागाधीरा अशा अनेक चित्रपटात काम केले.

  • 11/15

    तामिळमध्येही काजलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिथे तिने २००८ साली डेब्यु केला. तेलगु चित्रपट सृष्टीत तिने तिचा जास्त ठसा उमटवला.

  • 12/15

    बॉलिवूडमध्ये काजलला तिचे काम पाहून संधी मिळाली. मागाधीरामध्ये तिचे काम पाहिल्यानंतर रोहित शेट्टीने काजल अग्रवालला सिंघमची ऑफऱ दिली. काजल थेट अजय देवगणची नायिका बनली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला.

  • 13/15

    सिंघमसाठी रोहित शेट्टी साध्या, निरागस चेहऱ्याच्या शोधात होता. माझा मागाधीरा चित्रपट पाहिल्यानंतर त्याने मला हा रोल ऑफर केला असे काजलने एका मुलाखतीत सांगितले.

  • 14/15

    सिंघम नंतर काजलने स्पेशल २६ मध्ये अक्षय कुमारसोबत काम केले. यात ती अक्षयची नायिका होती.

  • 15/15

    काजलचा सुंदर सोज्वळ चेहरा आणि निरासग हास्य़ पाहून अनेक जण तिच्या प्रेमात पडतात. तरुणाईमध्ये ती लोकप्रिय आहे.

Web Title: Know about singham actress kajal aggarwal who got into films by chance dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.