अभिनेता आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप यांनी त्यांचं मुंबईतील घर अत्यंत कल्पकतेने सजवलं आहे. आयुषमान आणि ताहिरा आपल्या दोन मुलांसोबत या घरात राहतात. -
चार हजार चौरस फुटांच्या या घरात सात बेडरुम आहेत.
ताहिराच्या मैत्रिणीनेच त्यांच्या या घराचं इंटेरिअर डिझायनिंग केलंय. -
-
संपूर्ण घराला पांढरा रंग देण्यात आला आहे.
घरात मॉडर्न आर्टच्या वस्तू, लाइट्स, फर्निचर यांची निवड फार कल्पकतेने केली आहे. घरातील एका कोपरा आयुषमानच्या पुरस्कारांनी आणि पुस्तकांनी सजवण्यात आला आहे. लिव्हिंग रुममधील फर्निचरसुद्धा पांढऱ्या रंगसंगतीचे निवडले गेले आहेत. आयुषमानच्या बालकनीतून शहराची सुंदर झलक पाहायला मिळते. -
ताहिराला पांढरा रंग खूप आवडत असल्याने घराची सजावट त्याच रंगात करण्यात आली आहे.
-
सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ आयुषमान, ताहिरा
आयुषमान खुरानाचं मुंबईतील स्टायलिश घर
Web Title: Step inside ayushmann khurrana tahira kashyap serene and stylish mumbai home ssv