-
नेहा महाजनचा विषय निघाला की, एक बोल्ड, बिनधास्त अभिनेत्री नजरेसमोर येते. पण नेहाची ओळख इतकीच मर्यादीत नाहीय. त्या पलीकडे जाऊन ती एक संवेदनशील, प्रतिभावान अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य – नेहा महाजन इन्स्टाग्राम)
-
नेहा महाजन हे नाव मराठी चित्रपट रसिकांना माहित असले तरी तिने फक्त मराठीतच नाही तर मल्याळम, बंगाली, हिंदी, मराठी अशा सिनेमांमध्ये सुद्धा काम केले आहे. नेहाला विविध भाषांमध्येही खूप रस आहे.
-
२०१२ साली दीपा मेहताच्या 'मिडनाइट चिल्ड्रन' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सलमान रश्दी यांच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारीत होता.
-
२०१३ साली तिने 'हॅम्लेट' या मराठी नाटकातही काम केले आहे.
-
नेहा महाजनने 'आजोबा', 'संहिता', 'सिद्धांत', 'नीळकंठ मास्तर' या मराठी तर 'जीबून संदेश' या आोरिया फिल्ममध्ये भूमिका केल्या आहेत.
-
'द पेंटेड हाऊस' या सिनेमातून तिने २०१५ साली मॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
मागच्यावर्षी नेटफ्लिक्सवर आलेल्या दीपा मेहता यांच्या लैला वेबसीरीजमध्येही नेहामहाजनने काम केले आहे. रोहित शेट्टीच्या सिम्बामध्ये नेहाने भूमिका साकारली आहे.
-
नेहामध्ये एक संगीतप्रेमीही दडलेली आहे. तिने तिच्या बाबांकडे म्हणजे पंडित विदुर महाजन यांच्याकडे सतारवादनाचं शिक्षण घेतले आहे.
-
महाराष्ट्रात पुण्यामध्ये तळेगाव दाभाडे येथे तिचा जन्म झाला.
-
नेहाने अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ट्रिंबल टेक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले व पुण्याच्या विद्यापीठातून फिलॉसॉपी या विषयात पदवी मिळवली.
-
२०१५ सालच्या 'कॉफी आणि बरचं काही' मधील तिची आभाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मुख्य भूमिकेत नसूनही तिने बहिणीची भूमिका साकारताना आपल्या अभिनयाने छाप पाडली होती.
-
'छायम पोसिया वीडू' या तमीळ चित्रपटासाठी तिने एक न्यूड सीन दिला होता. हा सीन व्हायरल झाल्यानंतर बरीच चर्चा झाली होती.
-
बारावी झाल्यानंतर भारतात आल्यानंतर नेहाला पहिला ब्रेक मिळाला तो सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या 'बेवक्त बारीश' या सिनेमात.
-
अल्पावधीत नेहाने या इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली असून तिचा एक वेगळा चाहतावर्ग देखील आहे.
-
लहानपणापासूनच नेहाला अभिनय क्षेत्राचं आकर्षण होतं. पण, त्याचा करिअर म्हणून तिने कधी विचार केला नव्हता. एमए झाल्यानंतर मात्र अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं तिने पक्कं ठरवलं.
PHOTOS: फक्त बोल्ड नाही तर त्यापलीकडच्या नेहा महाजनला समजून घ्या
Web Title: Know about marathi actress neha mahajan dmp