अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. (सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सुशांत अंकिता फॅनपेज) १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अजूनही सुशांतचे जुने फोटो, व्हिडीओ चाहते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे सुशांत व अंकिता लोखंडे हे दोन नवीन चेहरे घराघरांत पोहोचले. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान हे दोघं प्रेमात पडले होते. अंकिताच्या घराचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्या घराची एक भिंत सुशांतसोबतच्या फोटोंनी सजवल्याचं दिसत आहे. दोघं सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. २०१६ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं होतं. अंकिताने सुशांतच्या स्ट्रगलिंग काळात फार मदत केल्याचं त्याचे मित्र सांगतात. अंकिता व सुशांतचा जवळचा मित्र संदीप सिंह याने पोस्ट लिहित अंकिताचं कौतुक केलं होतं. अंकिता सुशांतसाठी तिचं करिअरसुद्धा सोडायला तयार होती, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं होतं. सुशांतने अंकिताने त्याच्या कुटुंबीयांशीही भेट करून दिली होती. 'पवित्र रिश्ता'च्या सेटवर अंकिता व सुशांत यांच्यात सुरुवातीला फारसं जमायचं नाही. याबाबतीत सुशांत एका मुलाखतीत म्हणाला होता. "अंकिताला आधी माझा फार राग यायचा. पण अखेर तिने मला हो म्हटलंय. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत १६-१७ तास राहता, तेव्हा साहजिकच तुमच्याकडे हो बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो." 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी शोमध्ये सुशांतने अंकिताला प्रपोज केलं होतं. सुशांत – अंकिताला एकत्र चित्रपटात काम करण्याची अनेकदा संधी मिळाली होती. पण कथानक त्यांच्या पसंतीला न पडल्याने त्यांनी नकार दिला होता. 'पीके' या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सुशांतने अंकिताशी लग्न करण्याबाबत म्हटलं होतं. पुढच्या वर्षी (2015) नोव्हेंबरमध्ये लग्न करणार, असं त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं. अंकिताला जोधपूरमध्ये लग्न करण्याची इच्छा आहे, असंही त्याने या मुलाखतीत म्हटलं होतं. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर काही भांडणांमुळे सुशांत-अंकिताचं २०१६ मध्ये ब्रेकअप झालं.
अंकिताने सुशांतसोबतच्या फोटोंनी सजवलं होतं घर; आता उरल्या फक्त आठवणी
Web Title: Sushant singh rajput and ankita lokhande pavitra rishta couple love story ssv