-
आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. तिने मराठी चित्रपटसृष्टी सह बॉलिवूडमध्येही स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. नुकताच अमृताने तिच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चला पाहूया…
-
अमृताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा भाऊ संदेश कुलकर्णीशी लग्न केले.
-
त्यांच्या लग्नाला नुकतीच १७ वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
अमृताने लग्नात लाल रंगाची साडी नेसली होती.
-
त्यावेळी अमृता अतिशय सुंदर दिसत होती.
-
हे फोटो शेअर करत तिने मी संदेशला पेढा भरवत असताना मागे उभ्या असलेल्या दोन्ही बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव अमूल्य आहेत असे कॅप्शनमध्ये म्हटले होते.
-
संदेश कुलकर्णी हे मराठी चित्रपटसृष्टीमधील एक अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत.
-
चाहत्यांनी अमृताच्या लग्नाच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
-
अमृताने 'सेक्रेड गेम्स', 'चोक्ड' या गाजलेल्या सीरिजमध्ये भूमिका साकारली आहे.
-
तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यातील 'गली बॉय' या चित्रपटातील तिच्या भूमिकेचेही कौतुक झाले होते.
अमृता सुभाषच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?
पाहा फोटो.
Web Title: Amruta subhash wedding photos avb