-
जिना करानो हे नाव भारतीयांमध्ये फारसं प्रचलित नसलं, तरी हॉलिवूडप्रेमी आणि मार्शल आर्ट्सच्या क्रीडाप्रेमींसाठी फार परिचयाचं आहे.
-
जिना नुकतीच आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टमुळे बरीच चर्चेत आली.
-
तिने तिच्या अकाऊंटवरून एक न्यूड फोटो शेअर केला होता. त्यावरून ती अचानक चर्चेत आली.
-
जिना ही मार्शल आर्ट्स क्रीडा प्रकारातील मिश्र विभागातील माजी महिला खेळाडू आहे. जिनाने मिश्र मार्शल आर्ट्सचे ८ पैकी ७ सामने जिंकले, पण एका सामन्यात तिला पराभव स्विकारावा लागला.
-
तिने वर्ल्ड एक्स्ट्रीम फायटिंग, वर्ल्ड प्रो फायटिंग चॅम्पियनशीप्स, स्ट्राईकफोर्स आणि एलिटएक्ससी अशा विविध मार्शल आर्ट्स स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला.
-
वुमेन्स फिदरवेट चॅम्पियनशीप स्पर्धेत तिला अंतिम फेरीत तिला ख्रिस सायबर्ग विरोधात पराभूत व्हावे लागले.
-
त्यानंतर जिना अभिनय क्षेत्राकडे वळली. तिने फास्ट अँड फ्यूरिअस ६, डेडपूल यांसारख्या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आपली छाप पाडली.
-
जिनाने अभिनयात नाव कमावलं, पण सध्या ती न्यूड फोटो पोस्ट केल्याप्रकरणी चर्चेत आली.
-
तिने एक न्यूड फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता.
-
त्या फोटोतून तिला व्यक्तिस्वातंत्र्याचा संदेश द्यायचा होता असं तिचं मत होतं.
-
इन्स्टाग्राम व्यवस्थापनाने तिने शेअर केलेले फोटो इन्स्टाग्राम नियमांनुसार आक्षेपार्ह असल्याचे सांगितले.
-
तसेच या फोटोवर कारवाई करत तो फोटो इंस्टाग्रामवरून काढून टाकण्यात आल्याचेही सांगितले.
-
इन्स्टाग्रामने दिलेल्या या दणक्यामुळे ती इन्स्टाग्राम व्यवस्थापनावर चांगलीच संतापली. तिने लगेच ट्वीट करत याचा निषेध केला आणि ही कारवाई अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचे सांगितले.
-
"ती पोस्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत होती. त्यामध्ये मी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही", अशा शब्दात तिने नाराजी व्यक्त केली.
-
दरम्यान, जिनाच्या टॉपलेस फोटोवर, "तू कपडे घाल. तू खूप सुंदर महिलांपैकी एक आहेस. तुला अशाप्रकारच्या फोटोंची काहीही आवश्यकता नाही", अशा कमेंट अनेकांनी केल्या होत्या.
न्यूड फोटो पोस्ट करणाऱ्या अभिनेत्रीला इन्स्टाग्रामचा दणका
Web Title: Hollywood star gina carano fumes after instagram deleted her nude photo vjb