• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. akshay kumar affair with actress puja batra and actress personal life nck

अक्षय कुमारसोबत अफेअरच्या चर्चा; नवऱ्यानं बाळाची मागणी करताच घेतला होता घटस्फोट

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
    • बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा असो किंवा रवीना टंडन अक्षय कुमारच्या अफेअरची चर्चा अनेकांनाच माहित आहे. यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचाही समावेश आहे. मात्र तिच्या आणि अक्षयच्या रिलेशनशिपबद्दल खूप कमी बोललं गेलं. या अभिनेत्रीचं नाव आहे पूजा बत्रा.
    • मॉडलिंगच्या दिवसात अक्षय कुमार आणि पूजा बत्रा खूप चांगले मित्र होते. पूजाने वयाच्या १६ व्या वर्षीच मॉडेलिंगला सुरूवात केली होती. १८ व्या वर्षीच पूजा बत्रानं‘फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल’चा किताब पटकावला. त्यानंतर पूजाला विरासत चित्रपट मिळाला.
    • विरासत सुपरहिट झाला अन् पुजा बत्रा बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध झाला. त्यावेळीच अक्षय कुमार आणि पूजा बत्रा यांच्या अफेअरची चर्चा होती
    • पूजासोबत अक्षय बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये जात होता. असं म्हटलं जाते की, त्यावेळी दोघे रिलेशनशीपमध्ये होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार अक्षय कुमार ज्यावेळी पूजा बत्राला डेट करत होता तेव्हाच तो रवीनासोबतही रिलोशनमध्ये होता.
    • मीडिया रिपोर्ट्सनुसार, हळूहळू अक्षयच्या चित्रपटांना यश मिळू लागलं आणि तो प्रेक्षकांची मनं जिंकू लागला. या यशानंतर पूजा आणि अक्षयचे मार्ग वेगळे झाले.
    • इतकंच नव्हे तर पूजामुळेच अक्षयला बॉलिवूडमध्ये एण्ट्री मिळाली असंही म्हटलं जातं. पूजा मॉडेलिंग करत असताना अक्षय तिला डेट करत होता. तिच्यासोबत बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये जाऊ लागल्यानंतर अक्षयच्या ओळखी वाढल्या आणि त्यातूनच त्याला बॉलिवूडमध्ये एण्ट्री मिळाली असं म्हटलं जातंय.
    • २००३ मध्ये पूजानेही ऑर्थोपिडिशियन सर्जन डॉक्टर सोनू आहलुवालियासोबत लग्न केलं. मात्र दुर्दैवाने पूजाचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. २०१२ मध्ये तिचा घटस्फोट झाला.
    • काही चर्चा अशाही समोर आल्यात की, पूजाचा पतीला बाळ हवं होतं अन् पुजा करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं होतं. त्यामुळे त्यांच्यात दररोज भांडणं होतं होती. ही भांडणे अखेर घटस्फोटापर्यंत पोहचली.
    • २०१९ मध्ये पूजा बत्रा कोणताही गाजावाजा न करता विवाहबंधनात अडकली . आपला प्रियकर नवाब शाहसोबत पूजा बत्राने लग्नगाठ बांधली
    • 1/10

      पूजा बत्रा ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. हसीना मान जायेगी, भाई आणि विरासत हे तिचे चित्रपट प्रामुख्याने गाजले होते. अनिल कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या नायक चित्रपटातही पूजा दिसली होती. मात्र यानंतर तिने बॉलिवूडपासून फारकत घेतली होती. (All Photos: Social media)

Web Title: Akshay kumar affair with actress puja batra and actress personal life nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.