येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार असून निवडणुकीच्या रिंगणात अमेरिकेचा प्रसिद्ध गायक, रॅपर केन वेस्ट उतरला आहे. मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहे, असं केनने ट्विट करताच त्याची पत्नी किम कर्दाशियन ट्विटरवर जोरदार ट्रेण्ड होत आहे. हॉलिवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून अभिनेत्री किम कार्दशियनकडे पाहिलं जातं. किम तिच्या अभिनयापेक्षा चित्रविचित्र पेहराव, वादग्रस्त वक्तव्य, लीक होणारे खासगी व्हिडीओ आणि मादक फोटोशूट यांमुळेच जास्त चर्चेत असते. -
इन्स्टाग्राम अकाऊंटवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रिटींपैकी ती एक आहे.
किम एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी तब्बल ६.४ कोटी रुपये घेते. ब्रँडन जेनर, ब्रॉडी जेनर, बर्ट जेनर, केसी जेनर, केंडल जेनर, क्लो कार्दशियन, कोर्टनी कार्दशियन, काइली जेनर, रोब कार्दशियन हे किम कार्दशियनचे सर्व भाऊ-बहीण प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत. किमने २००७ मध्ये 'प्लेबॉय' मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. सर्व छायाचित्र सौजन्य : फेसबुक/ किम कार्दशियन
अमेरिकेची फर्स्ट लेडी होण्याचं स्वप्न पाहणारी किम कार्दशियन आहे तरी कोण?
मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहे, असं केनने ट्विट करताच त्याची पत्नी किम कर्दाशियन ट्विटरवर जोरदार ट्रेण्ड होत आहे.
Web Title: After kanye west declares us presidency bid fans have thoughts on kim kardashian as first lady ssv