अनेकदा चित्रपटांमधील बालकलाकारांची भूमिका प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेते. असेच काही प्रसिद्ध बालकलाकार आता कसे दिसतात व ते आता काय करतात ते पाहा… -
मालविका राज- कभी खुशी कभी गम या चित्रपटात करिना कपूरच्या लहानपणीची भूमिका मालविकाने साकारली होती. मालविकाने नंतर तेलुगू चित्रपटातही काम केलं.
-
झनक शुक्ला- कल हो ना हो चित्रपटात जियाची भूमिका साकारणाऱ्या झनकने नंतर अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिचा स्वत:चा युट्यूब चॅनलसुद्धा आहे.
परझान दस्तुर- 'कुछ कुछ होता है' चित्रपटात पंजाबी मुलाची भूमिका साकारणारा परझान सध्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतोय. एहसास चन्ना- कभी अलविदा ना कहना या चित्रपटात शाहरुख खानच्या मुलाची भूमिका एहसासने साकारली होती. एहसास कलाविश्वातच काम करत आहे. साक्षी सेम- अजय देवगणच्या राजू चाचा या चित्रपटात भूमिका साकारलेली साक्षी २०१५ मध्ये 'रहस्य'मध्ये झळकली होती. आएशा कपूर- संजय लीला भन्साळी यांच्या 'ब्लॅक' या चित्रपटात भूमिका साकारलेली आएशा सध्या जर्मनीमध्ये राहत असून कलाविश्वापासून दूर आहे. जिब्रान खान- कभी खुशी कभी गम चित्रपटात जिब्रानने शाहरुखच्या मुलाची भूमिका साकारली होती. २००२ मध्ये 'रिश्ते' चित्रपटात तो झळकला होता. अथित नाईक- कल हो ना हो या चित्रपटात प्रिती झिंटाच्या छोट्या भावाची भूमिका याने साकारली होती. त्यानंतर तो कोणत्याच मालिकेत किंवा चित्रपटात झळकला नाही. पूजा रुपारेल- दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे या चित्रपटात काजोलच्या बहिणीची भूमिका साकारलेली पूजा स्टँड अप कॉमेडियन असून ती गायनसुद्धा करते. आदिल रिझवी- अकेले हम अकेले तुम या चित्रपटात त्याने आमिर खानच्या मुलाची भूमिका साकारली होती. अभिषेक शर्मा- 'कहो ना प्यार है' या चित्रपटात हृतिकच्या छोट्या भावाची भूमिका साकारणारा अभिषेक नंतर छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये झळकला. जुआना संघवी- 'हे बेबी'मध्ये एंजल म्हणून झळकलेली जुआना
तुमचे लाडके बालकलाकार पाहा आता दिसतात तरी कसे?
Web Title: Child stars of the 90s watch then and now pictures ssv