-
आज भलेही ऑनस्क्रीन किसींग सर्वसामान्य झालं असेल. परंतु एकेकाळी खुल्या विचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेसाठीही ते स्वीकारणं तितकं सोपं नव्हतं. (सर्व फोटो – द किस, यूट्युब)
-
एकेकाळी अमेरिकेतही अशा दृश्यांवर कात्री लावली जायची किंवा त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळायचं. असंच काही पहिल्या ऑनस्क्रीन किसींग सीनबाबतही घडलं होतं.
-
१८९६ मध्ये एक सायलेंट चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं नाव होतं 'द किस'. हा जगातिल पहिला अशा चित्रपटांमध्ये सामिल होता जो लोकांना कमर्शिअल पद्धतीनं दाखवण्यात आला होता. माध्यमांमधील रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचं चित्रिकरण कॅनडामध्ये करण्यात आलं होतं.
-
या सीनमध्ये स्टेज म्यूझिकल 'दी विडो जोन्स'च्या फायनल सीनला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता जो एक एक किस सीन होता. १८ सेकंद सुरू असलेल्या या सीममध्ये सुरूवातीला दोघांनाही अवघडल्यासारखं वाटत असल्याचं दिसलं.
-
ऑनस्क्रीन पहिल्यांदा किस सीन देणाऱ्या या अभिनेत्याचं नाव जॉन राईट्स आणि अभिनेत्रीचं नाव इरविन असं होतं. यादरम्यान, ते एकमेकांनी बोलतानाही दिसत होते. सध्या ही व्हिडीओ क्लिप यूट्युबवरही उपलब्ध आहे.
-
या चित्रपटाची निर्मिती एडिसन स्टुडिओजनं केली होती. थॉमस एडिसन यांचाच हा स्टुडिओ असून त्यांनी १९८४ मध्ये तो सुरू केला होता. अमेरिकेचे विलियम हेज यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. विलियम यांनी त्या काळा तब्बल १७५ सायलेंट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.
-
थॉमस एडिसन यांच्या या प्रोजेक्टबद्दल अनेकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. या चित्रपटाचे मुख्य अभिनेते जेव्हा आपल्या पत्नीसोबत स्टेजवर आले होते त्यावेळी त्यांना या चित्रपटातील किसींग सीन रिक्रिएट करण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु त्यांच्या पत्नीनं याला मनाई केल्यानंतर प्रेक्षकांमधील एका महिलेने त्यांच्यासोबत तो सीन देण्यास होकार दिला होता.
-
१९०० मध्ये चित्रित करण्यात आलेल्या एका चित्रपटातील किस सीन हा पहिला ऑनस्क्रीन किस सीन असल्याचं सांगितलं जातं. परंतु पहिल्या किस सीनला अनेक थिएटर्समध्ये बॅन करण्यात आलं होतं. त्यामुळे या दृश्यात असलेल्या कलाकारांची प्रेक्षकांना ओळखही झाली नव्हती.
-
१८९६ मध्ये चित्रित झालेल्या या चित्रपटाची लोकप्रियता इतकी होती की दोन वर्षांनंतर १८९८ मध्ये सेंट सॅटेल आणि गर्टी ब्राउनसुद्धा अशाच एका चित्रपटात दिसले होते. एका शॉर्ट फिल्ममध्ये हे दोन्ही स्टार एकत्र दिसले. या चित्रपटाचे नाव होते समथिंग गुड – निग्रो किस. २०१७ मध्ये चित्रपट इतिहासकारांना हे फुटेज सापडले. शिकागोमधील विल्यम सेलिग यांनी हे फूटेज शूट केलं होतं.
-
दरम्यान, यानंतर काही जणांनी त्यांना सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. तर काही जणांकडून त्यांना वाईट अनुभवही आले होते. या दृश्यावरून रोमन कॅथलिक चर्चनं सेंन्सॉरशिपबद्दलही म्हटलं होतं. तर अनेक वृत्तपत्रांनीही या दृश्याला विरोध केला होता.
सव्वाशे वर्षांपूर्वी ‘या’ चित्रपटात पहिल्यांदा चित्रित झालेला किस सीन
Web Title: First kiss scene shot in movie the kiss 124 years ago youtube facebok photos see how was reactions jud