सुशांत सिंह राजपूत- १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा 'दिल बेचारा' हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे त्याचं प्रदर्शन लांबणीवर टाकलं होतं. मात्र आता त्याचा हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. श्रीदेवी- २४ फेब्रुवारी, २०१८ रोजी दुबईतल्या हॉटेलमध्ये अभिनेत्री श्रीदेवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुबईत त्या एका लग्नसोहळ्यासाठी गेल्या होत्या. श्रीदेवी यांनी 'झिरो' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यांच्या मृत्यूनंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. ओम पुरी- ६ जानेवारी २०१७ रोजी ओम पुरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनाच्या एक महिन्यापूर्वीच त्यांनी 'ट्यूबलाइट' या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. हा चित्रपट नंतर २५ जून २०१७ रोजी प्रदर्शित झाला. राजेश खन्ना- १८ जुलै २०१२ रोजी राजेश खन्ना यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर 'रियासत' हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. शम्मी कपूर – १४ ऑगस्ट २०११ रोजी शम्मी कपूर यांची प्राणज्योत मालवली. रणबीर कपूरच्या 'रॉकस्टार' चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनानंतर नोव्हेंबर २०११ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. स्मिता पाटील- १३ डिसेंबर १९८६ रोजी स्मिता पाटील यांचे निधन झाले. त्यांचा शेवटचा चित्रपट 'गलियों के बादशाह' १७ मार्च १९८९ रोजी प्रदर्शित झाला. दिव्या भारती- वयाच्या १९ व्या वर्षी दिव्या भारतीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूच्या नऊ महिन्यांनंतर 'शतरंज' हा चित्रपट प्रदर्शित झाला. मधुबाला- २३ फेब्रुवारी १९६९ रोजी मधुबाला यांचे निधन झाले. त्यांचा शेवटचा चित्रपट 'ज्वाला' १९७१ मध्ये प्रदर्शित झाला. मीना कुमारी- 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीना कुमारी यांचे ३१ मार्च १९७२ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर 'गोमती के किनारे' हा चित्रपट प्रदर्शित झाला. संजीव कुमार – 'शोले'मध्ये ठाकूरची भूमिका साकारणारे संजीव कुमार यांचे कार्डिअॅक अरेस्टने १९८५ मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाच्या आठ वर्षांनंतर 'प्रोफेसर की पडोसन' हा चित्रपट प्रदर्शित झाला.
‘या’ कलाकारांनी चित्रपट प्रदर्शनाआधीच घेतला जगाचा निरोप
Web Title: Bollywood actors who passed away before their last film released ssv