चार महिन्यांपासून देशात करोना प्रादुर्भाव सुरु आहे. दररोज करोना विषाणूचे रुग्ण वाढतच आहे. अशातच बॉलिवूडमध्येही करोनानं शिरकाव केला आहे. अमिताभ बच्चन यांच्या परिवाराला करोनाची लागण झाली आहे. याशिवाय इतर सेलिब्रेटिंनाही करोना झाल्याचं समोर आलं आहे. अमिताभ बच्चन करोनाबाधित झाल्याची बातमी ताजी असतानाच अभिषेक बच्चन यांनीही आपल्याला करोना झाल्याची माहिती दिली. अभिषेकच्या या माहितीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. त्यानंतर बच्चन परिवारातील इतर सदस्यांच्या चाचणी घेण्यात आली. यामध्ये अभिनेत्री एक्ट्रेस ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांनाही करोनाचा संसर्ग जाल्याचं स्पष्ट झालं. बच्चन परिवारात फक्त जया बच्चन यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांच्या परिवारातील सदस्यांनाही करोनाची लागण झाली आहे. अनुपम खेर यांनी स्वत ट्वटरवर यांची माहिती दिली. अनुपम खेर यांची आई दुलारी खेर आणि भाऊ राजू खेर यांना करोनाचा संसर्ग झाला. त्याशिवाय अनुपम खेर यांची पुतणी आणि वहिनीला करोनाचा संसर्ग झाला. कसौटी जिंदगी की फेम अभिनेता पार्थ समथान यालाही करोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर मालिकेची शुटूंग थांबवण्यात आलं. उंगली फेम अभिनेत्री रेचल व्हाइटलाही करोनाचा संसर्ग झाला आहे. तिने ट्विट करत याबाबत माहिती दिली. रेचल सध्या होम क्वारंटाइन आहे. बालाजी टेलीफिल्म्सच्या कार्यकारी उपप्रमुख तनुश्री दासगुप्ता यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. वरील सेलिब्रिंटीशिवाय याआधी 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमधून नावारुपास आलेली अभिनेत्री मोहिना कुमारी सिंह हिला देखील करोनाची लागण झाली होती. तिच्यामुळे तब्बल २२ लोकांना क्वारंटाईमध्ये ठेवण्यात आलं होतं. बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता किरण कुमार यांना देखील करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आता ते पूर्णपणे तंदुरुस्त झाले आहेत.
कहर! दोन दिवसांत हे ११ कलाकर झाले करोनाबाधित
Web Title: Bollywood bachchan and kher family corona positive parth samthaan tv actor nck