-
-
शरद केळकर : शरदने बाहुबली या सिनेमाच्या हिंदी डबिंगसाठी बाहुबली म्हणजेच प्रभासला आवाज दिला होता. त्याचबरोबर त्याने विन डिजल, जेसन क्लार्क आणि जेसन स्टेथम यांच्याशिवाय कित्येक हॉलिवूड स्टार्ससाठी डबिंगही केलं आहे.
-
रोहित रॉय : रोहितने 'गार्डियन्स ऑफ दि गॅलेक्सी भाग -२', 'अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर' आणि 'अॅव्हेंजर्स : एन्ड गेम' या सिनेमांसाठी पीटर क्विल आणि स्टार लॉर्ड यांच्या पात्रांना आवाज दिला आहे.
-
राजेश खट्टर : हॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा 'आयर्न मॅन'च्या हिंदी डबमध्ये रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांच्या आयर्न मॅन या प्रमुख पात्राला टीव्ही कलाकार राजेश खट्टर यांनी आवाज दिला आहे.
-
जॉय सेनगुप्ता : 'कॅप्टन अमेरिका' या हॉलिवूडपटाच्या हिंदी डबिंग सिनेमाला जॉय सेनगुप्ताने आपला आवाज दिला आहे.
-
सप्तर्षी घोष : 'अॅव्हेंजर्स'मध्ये थॉरचं पात्र रंगवणारा कलाकार क्रिस हेम्सवर्थसाठी हिंदी डबिंगमध्ये सप्तर्षी घोषने त्याला आवाज दिला आहे.
-
गौरव चोपडा : 'थॉर रैग्नारॉक' आणि 'अॅव्हेंजर्स : इनफिनिटी वॉर' या सिनेमातील थॉरच्या पात्रासाठी गौरव चोपडाने आपला आवाज दिला आहे.
हॉलिवूड ते टॉलीवूड… ‘हे’ आहेत आवाजाच्या दुनियेतील ‘बाहुबली’
Web Title: Tv actors voice actors who dubbed for hindi and hollywood super characters asy