लॉकडाउनदरम्यान अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत या कलाकारांचा साखरपुडा व लग्नसोहळा पार पडला. सोनाली कुलकर्णी- मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या वाढदिवशी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. सोनालीने दुबईत कुणाल बेनोडेकरशी साखरपुडा केला. शर्मिष्ठा राऊत- 'बिग बॉस मराठी १' फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने तेजस देसाईशी साखरपुडा केला. लॉकडाउनमध्ये इगतपुरी येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तिचा हा साखरपुडा पार पडला. सुवेधा देसाई- 'वैजू नंबर १' या मालिकेत भूमिका साकारत असलेली अभिनेत्री सुवेधा देसाई हिने सागर गावकरशी लग्न केलं. १ जून रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला. तेजपाल वाघ- 'लागीरं झालं जी' मालिकेतील अभिनेता तेजपाल वाघ याने २ जुलै रोजी किरण घाडगेशी लग्नगाठ बांधली. एप्रिल किंवा मे महिन्यात या दोघांचं लग्न होणार होतं. मात्र लॉकडाउनमुळे त्यांना लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली. शुभांगी सदावर्ते- 'सावित्रीजोती' मालिकेतील अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने १३ जुलै रोजी लग्नगाठ बांधली. संगीतकार व दिग्दर्शक आनंद ओकशी तिने लग्न केलं. -
अक्षय वाघमारे- अभिनेता अक्षय वाघमारेनं गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता हिच्याशी लग्नगाठ बांधली. मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेऊन ८ मे रोजी हा लग्नसोहळा पार पडला.
-
‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अर्चना निपाणकर हिने लग्नगाठ बांधली. पार्थ रामनाथपूर आणि अर्चना गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
दोनाचे चार हात; लॉकडाउनच्या काळात ‘या’ मराठी कलाकारांची जमली जोडी
Web Title: Sonalee kulkarni to kiran gaikwad pictures from engagement and wedding of marathi tv actors during lockdown ssv