-
छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' या मालिकेतील सर्वच कलाकार नेहमी चर्चेत असतात. पण बबिताचे पात्र साकारणाऱ्या मुनमुन दत्ताने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. पण मुनमुन तारक मेहताच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेते हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया..
-
२००४मध्ये मुनमुनने 'हम सब बाराती' या मालिकेमध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.
-
त्यानंतर मुनमुनने चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.
-
तिने 'मुंबई एक्सप्रेस' या चित्रपटात मनिषा कोइरालासोबत काम केले आहे.
-
त्यानंतर २००६मध्ये तिने 'हॉलिडे' या चित्रपटात काम केले होते.
-
तिने एका म्यूझिक व्हिडीओमध्ये देखील काम केले आहे.
-
मुनमुनने पत्रकार व्हावे अशी तिच्या कुटुंबीयांची इच्छा होती. पण ती एक अभिनेत्री झाली.
-
करिअरच्या सुरुवातीला मुनमुन फॅशने शोमध्ये सहभागी झाली होती.
-
ती अभिनेत्री होण्यापूर्वी एक मॉडेल आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री माधूरी दिक्षित मुनमुनची आवडती अभिनेत्री आहे.
-
सध्या मुनमुन 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले आहे.
-
ती मालिकेतील एका भागासाठी जवळपास ३० ते ३५ हजार रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
मालिकेतील तिचे बबिता हे पात्र घरघरात पोहोचले.
-
बबिता आणि जेठालाल यांच्यातील संवाद चाहत्यांना विशेष आवडत असल्याचे पाहायला मिळते.
‘तारक मेहता…’मधील बबिता घेते एका एपिसोडसाठी इतके मानधन
जाणून घ्या तिच्या विषयी काही खास गोष्टी..
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah babita aka munmun sen fees per episode avb