-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान 'अलादीन- नाम तो सुना होगा' या मालिकेतून नावारुपास आलेली टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर बारावीत चांगल्या मार्कांनी पास झाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र अवनीत आपल्या निकालाबाबात संतुष्ट नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने कमी मार्क मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अवनीतला बारावीच्या परिक्षेत ७४ टक्के मिळाले आहेत. परंतु अभ्यासात हुशार असलेल्या अवनीतला हे मार्क पुरेसे वाटत नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आणखी चांगले मार्क मिळवता आले असते असं ती मुलाखतीत म्हणाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मालिकेच्या चित्रीकरणामुळे तिला अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. शिवाय ऐन परिक्षेच्या वेळी ती आजारी पडली होती. परिणामी तिला चांगले मार्क मिळाले नाहीत असं मत अवनीतने व्यक्त केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु तिचे कुटुंबिय आणि चाहते मात्र खुश आहेत. त्यांनी सोशल मीडियाद्वारे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मुलींचा निकाल ९३.८८ टक्के तर मुलांचा निकाल ८८.४ टक्के लागला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कला शाखाचे निकाल ८२.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९१.२७ टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. त्याशिवाय MCVC 95.07 टक्के निकाल लागला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'अलादीन- नाम तो सुना होगा' या मालिकेतून नावारुपास आलेली टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'अलादीन- नाम तो सुना होगा' या मालिकेतून नावारुपास आलेली टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
१२वीत कमी मार्क मिळाल्यामुळे अभिनेत्री नाराज; ‘या’ कारणामुळे झाला नव्हता अभ्यास
Web Title: Avneet kaur not expect to get this percentage 12th boards mppg