दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता नितीन याचा साखरपुडा पार पडला. कुटुंबीयांच्या उपस्थितीत नितीन व शालिनीचा साखरपुडा पार पडला. नितीनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. नितीन रेड्डी आणि शालिनी कंडुकरी येत्या २६ जुलै रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. हैदराबादमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. नितीनने दुबईत 'बिग-फॅट' डेस्टिनेशन लग्नाचं प्लॅनिंग केलं होतं. मात्र करोना व्हायरसचा प्रादुर्भाव व लॉकडाउनमुळे हा प्लान रद्द करावा लागला. नितीनने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनासुद्धा लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. नितीनने खास त्यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचं आमंत्रण दिलं. नितीनला 'भीष्म' हा तेलुगू चित्रपट चांगलाच गाजला. यामध्ये त्याची व रश्मिका मंदानाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. नितीन आणि शालिनी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. कॉमन फ्रेंडमुळे या दोघांची पहिल्यांदा ओळख झाली आणि त्यांनंतर त्यांच्यातील मैत्री वाढू लागली. -
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम
दाक्षिणात्य सुपरस्टार नितीनचा साखरपुडा; ‘या’ तारखेला होणार लग्न
Web Title: Nithiin and shalini engagement couple exchange rings ahead of their wedding see pics ssv