प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गायक, अभिनेता हिमेश रेशमियाने ११ मे २०१८ रोजी अभिनेत्री सोनिया कपूरशी लग्न केले. हिमेशने २०१७ मध्ये पत्नी कोमलला घटस्फोट देत २२ वर्षांचा संसार मोडला. दोघांच्या वेगळे होण्यामागचं कारण टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूर होती. हिमेश आणि सोनिया लिव्ह-इनमध्ये राहत होते. त्यानंतर ११ मे २०१८ रोजी हिमेशने सोनिया कपूरशी लग्न केले. घटस्फोटापूर्वीही हिमेश सोनियासोबत राहत होता. गाण्याचे रेकॉर्डिंग असो किंवा रिअॅलिटी शो, सोनियाला नेहमीच हिमेशसोबत पाहिलं गेलं होतं. २००६ मध्ये हिमेश आणि सोनियाचे अफेयर चर्चेत आले होते. पहिली चार वर्षे हिमेशने त्याच्या घरच्यांना तिची ओळख केवळ ‘चांगली मैत्रिण’ अशीच करुन दिली होती. -
पण, या दोघांची वाढती सलगी मीडियापासून लपून राहिली नाही.
कोमलला म्हणजेच हिमेशच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला याची पूर्ण कल्पना होती. असे असले तरी, तिने कधीच या सर्व प्रकाराला उघडपणे विरोध केला नाही. -
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, हिमेश रेशमिया
जिच्यामुळे घटस्फोट झाला, त्याच अभिनेत्रीसोबत हिमेश रेशमिया राहत होता लिव्ह-इनमध्ये
Web Title: Singer composer himesh reshammiya and sonia kapoor love story ssv