-
बोर्डाच्या परीक्षांमध्ये किंवा शालेय शिक्षणात आपण किती टक्के मार्क मिळवले यावर भविष्यात आपण किती य़शस्वी होऊ हे ठरत नाही.
-
ही बाब बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी सिद्ध करुन दाखवली आहे. बॉलिवूडमध्ये यशस्वी करियर बनवणाऱ्या काही कलाकारांनी बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवले आहेत.
-
जाणून घेऊयात बॉलिवूडमध्ये यशस्वी करियर बनवणाऱ्या कुठल्या स्टार्सना बोर्डाच्या परीक्षांमध्ये किती गुण मिळवले होते.
-
अनुष्का शर्मा : अनुष्का केवळ अभिनयातच नव्हे तर अभ्यासात देखील हुशार होती. तिने दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के तर बारावीच्या परीक्षेत ८९ टक्के मार्क मिळवले होते.
-
शाहरुख खान : बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुखला बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ८०.५० टक्के मार्क मिळाले होते. शाहरुख अभ्यासात आघाडीवर असतानाच एक चांगला फुटबॉलपटू देखील होता.
-
श्रद्धा कपूर : श्रद्धाचं शालेय शिक्षण मुंबईच्या जमनाबाई नरसी आणि अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून झालं आहे. तिला दहावीला ७० टक्के तर बारावीला ९५ टक्के मार्क मिळाले आहेत.
-
रणबीर कपूर : रणबीर अभिनयात एकदम अव्वल असला तरी तो अभ्यासात खूपच मागे होता. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत त्याला ५६ टक्के मार्क मिळाले होते.
-
आलिया भट्ट : आलियाला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ७१ टक्के मार्क मिळाले होते.
-
कंगना रनौत : बॉलिवूडची क्वीन म्हणून बिरुद मिरवणारी कंगना बारावीच्या परीक्षेत केमिस्ट्री या विषयात नापास झाली होती. त्यानंतर तीने शिक्षण सोडून देत बॉलिवूडमध्ये आपलं नशिब आजमावलं.
-
कृती सॅनन : इंजिनिअरिंगची विद्यार्थीनी असलेल्या कृतीला दहावीच्या परीक्षेत ७२ टक्के तर बारावीला ९० टक्के मार्क मिळाले होते.
कंगना ते शाहरुख जाणून घ्या सुपरस्टार्सचे बोर्डाच्या परीक्षेतले मार्क्स
Web Title: Kangna ranaut to shahrukh khan know about board rexam marks of bollywood actors asy