टॉलिवूड गाजवल्यानंतर बॉलिवूडकडे पावलं वळविणारा अभिनेता म्हणजे धनुष. रांझणा या चित्रपटातून धनुषने त्याच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आज याच सुपरस्टारचा वाढदिवस. (सौजन्य : सर्व फोटो जनसत्ता येथून) टॉलिवूड आणि बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्याचे आज असंख्य चाहते आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यातच तो दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे. त्यामुळे रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या आणि त्याची लव्हस्टोरी नेमकी कशी आहे आज जाणून घेऊ. २०१३ मध्ये 'रांझणा'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा धनुष हा केवळ उत्तम अभिनेताच नव्हे तर तो एक चांगला गायक देखील आहे. काही वर्षांपूर्वी त्याचं कोलावरी डी हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. धनुष आणि ऐश्वर्या यांच्याकडे टॉलिवूडमधील मोस्ट रोमॅण्टिक कपल म्हणून पाहिलं जातं. परंतु, यांची लव्हस्टोरी हटके आहे. २००२ मध्ये kadhal konden च्या स्क्रीनिंगच्या वेळी ऐश्वर्या आणि धनुष यांची पहिली भेट झाली. चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ऐश्वर्या वडील रजनीकांत यांच्यासोबत आली होती. त्यावेळी धनुषचं परफॉर्मन्स पाहून ती त्याच क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती. विशेष म्हणजे स्क्रिनिंगच्या दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याने धनुषच्या घरी पुष्पगुच्छ पाठवत त्याला संपर्कात रहा असं सांगितलं. ऐश्वर्याने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २००४ रोजी धनुष आणि ऐश्वर्याने घरातल्यांच्या संमतीने लग्न केलं. या दोघांचा लग्न सोहळा दाक्षिणात्य कलाविश्वातील गाजलेल्या लग्नसोहळ्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. या दोघांना लिंगा राजा आणि यात्रा राजा ही दोन मुलं आहेत. ऐश्वर्या एक उत्तम नर्तिका असून ती क्लासिकल डान्सर आहे. -
वडील रजनीकांत यांच्यासोबत ऐश्वर्या
पहिल्याच भेटीत रजनीकांत यांची लेक धनुषच्या प्रेमात; जाणून घ्या लव्हस्टोरी
पुष्पगुच्छासोबतचा ‘तो’ खास मेसेज अन् ‘कोलावरी डी’फेम धनुषच्या लव्हस्टोरीची गाडी सुसाट!
Web Title: Dhanush and his lovely wife aishwarya how they met and in loved know the fact and love story ssj