-

आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. आज १ ऑगस्ट रोजी तापसीचा वाढदिवस आहे. आपण तिच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. तापसी बॉलिवूडमधील मार्च २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीमधील यशस्वी अभिनेत्री ठरली आहे. चला जाणून घेऊया तिने किती कमाई केली होती.
-
तापसीने २०१३मध्ये 'चष्मेबद्दूर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
त्यानंतर तिच्या 'पिंक' या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. या चित्रपटानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या होता.
-
तिने ‘बदला’,‘गेम ओव्हर’,‘मिशन मंगल’,‘सांड की आँख’ आणि ‘थप्पड’ या चित्रपटांमध्ये काम केले
-
‘बदला’ हा चित्रपट ८ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. तिच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८८ कोटी रुपये कमाई
-
‘गेम ओव्हर’ (१४ जून २०१९) – ४.६९ कोटी रुपये कमाई
-
‘मिशन मंगल’ (१५ ऑगस्ट २०१९)- २०२.९८ कोटी रुपये कमाई
-
‘सांड की आँख’ (२५ ऑक्टोबर २०१९)- २३.४० कोटी रुपये कमाई
-
‘थप्पड’ (२८ फेब्रुवारी २०२०) – ३३.०६ कोटी रुपये कमाई
-
-
तापसीच्या सर्व चित्रपटांनी मिळून एकूण ३५२ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे ती बॉलिवूडमधील मार्च २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीमधील यशस्वी अभिनेत्री ठरली
-
-
यंदा तिचे रश्मी रॉकेट, हसीन दिलरुबा, शाब्बास मिथू आणि लूप लपेटा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
Birthday Special : तापसी पन्नू ठरली बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री, वर्षभरात कमावले इतके कोटी
जाणून घ्या तिच्या चित्रपटांविषयी..
Web Title: Birthday special highest grossing actress at the box office in last one year avb