
टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली. समीर ४४ वर्षांचा होता. समीरच्या घरातून कोणतीच सुसाइट नोट मिळालेली नाही. नाइट ड्युटीवर असलेल्या इमारतीच्या वॉचमनने आधी समीरचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने पोलिसांना व सोसायटीच्या सदस्यांना याविषयीची माहिती दिली. समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. “आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याता आला आहे”, अशी माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जॉर्ज फर्नांडिस यांनी ‘मिड डे’ला दिली. समीरने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकांमध्ये समीरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. 'हँसी तो फंसी' या चित्रपटातही छोटीशी भूमिका साकारली होती. अभिनयासोबतच समीरला फोटोग्राफी व कविता लिहिण्याची फार आवड होती. इन्स्टाग्राम अकाऊंटवर समीर त्याने काढलेले फोटो व त्याने लिहिलेल्या कविता पोस्ट करायचा. आणखी एका कलाकाराने टोकाचं पाऊल उचलल्याने कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. -
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम
आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या; मुंबईत राहत्या घरी घेतला गळफास
Web Title: Know about hasee toh phasee actor samir sharma who ends life at his malad home ssv