• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. solapur akshay indikar success story nck

मराठमोळ्या दिग्दर्शकाचा संघर्ष, कर्जाचे १५०० रुपये ते बर्लिन फिल्म फेस्टिवल

सिनेमामुळे सोलापूर ते बर्लिन पोहोचलेल्या अक्षयचा प्रवास

August 15, 2020 12:54 IST
Follow Us
    • पिढ्या न पिढ्या रस्त्यांनी भटकणाऱ्या एका मागासवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सोलापुरच्या अक्षय इंडीकरची यशोगाथा युवा वर्गाला प्रेरणा देणारी आहे…. ११ मध्ये नापासचा शिक्का बसणारा अक्षय आज एक मराठीमधील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नावारुपाला आला आहे…. आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये अक्षयची यशोगाथा पाहूयात…
    • सोलापुरातील एका खेडेगावातून अक्षय पुण्याला शिक्षणासाठी आला. ग्रामिण भागांतील भाषाशैली नाटक करताना तेथील उच्चप्रभू विद्यार्थांना खटकत होती… अक्षयची त्यांनी अनेकदा रॅगींगही केली…. या रॅगिंगमुळे अक्षय थेटरच्या अंधारात जाऊन रडत बसायचा..
    • पण अक्षयनं जिद्द सोडली नाही, हरला नाही… परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यानं अगणित पुस्तकं वाचली… कष्ट घेतले … त्यानंतर यश त्याच्या पायात लोळण घालत होतं… एकवेळ रॅगिंग करणारी मुलं आज त्याला यशस्वी चित्रपट निर्माता म्हणून ओळखतात.
    • प्राथमिक शिक्षण घेत असताना अक्षयने जादूचा खेळ पाहिला अन् त्यानं जादूगार व्हायचं म्हणून आयुष्याची काही वर्ष खर्च केली. पण पुढे शाळेजवळ नाटक करणारी लोकं यायची त्यांच्या सोबत राहून पाहून अक्षयलाही नाटकाची ओढ निर्माण झाली.
    • नववीत असताना अक्षयने पहिल्यांदा नाटक केलं. घरात संघर्ष हा सुरवातीपासूनच होता तेच इथेही आलंच नाटकाचा महत्वाचा प्रयोग असताना बहीण आजारी पडली (प्रसंग) तरी सुद्धा अक्षयने ते नाटक केलं.
    • पाहता पाहता अक्षय दहावी पास झाला.. दहावीत ८० टक्के गुण असल्यानं घरच्यांनी अक्षयला पुण्यातील SP कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन दिला.
    • गावाकडून निघताना मोठ-मोठी स्वप्नं पाहाणारा अक्षय पुण्यात शिकायला आल्यानंतर सुरुवातील खचला… भाषेवरून होणारी रॅगिंग, उग्रीट शब्द, रडणे होतो यासराखे प्रकार त्याच्यासोबत घडले…
    • ११ वीचे शिक्षण घेत असताना उच्चप्रभू विद्यार्थी त्याला नाटकाच्या चर्चेतून हकलायचे, झाडू मार, वडे आन, आमच्यातला नाहीयेस, कापड्यावरून त्याला बोलायचे, कोवळं मन होतं, त्रास होतो, तू काहीच करू शकत नाही असं बोलायचे… हे सर्व घडत असताना ११ वीमध्ये अक्षय नापस झाला….
    • ११ वीत नापास झाल्यामुळे मग पुन्हा मोर्चा गावाकडे वळाला…. गावाजवळच्या एका शाळेत बारावीची परीक्षा दिली. अकरावीत नापास झाल्यामुळे पुण्याहून गावी जाताना अक्षयनं एक गोष्ट ठरवली होती…. ती म्हणजे ..पुण्यात पुन्हा येणारच. हे इतरांकडून होतं नाही, साधारणपणे मुलं नापास झाली की गावी जातात त्यांचं लग्न होतं पण ते पुन्हा पुण्यात येत नाहीत. आणि शेवटी बारावीची परीक्षा देऊन तो नव्या जोमानं पुन्हा पुण्यात आला.
    • पुण्यात पुन्हा आल्यानंतर एका बस स्टॉप अक्षय उभा होता… त्याचवेळी समोर एकजण चित्रपटाचं वर्कशॉपचं पोस्टर लावत होता… ते मोफत असल्यामुळे अक्षय सुद्धा त्या वर्कशॉपमध्ये सहभागी झाला. आणि तिथून त्याची पुन्हा चित्रपटाशी नाळ जोडली गेली.
    • बारावीच्या नंतर असणाऱ्या सुट्ट्यांमध्ये अक्षयनं एक चित्रपट तयार केला…त्यासाठी खूप पुस्तक वाचली, आत्मचरित्र वाचण्याचा छंदच जडला होता, दलित आत्मचरित्र वाचन हे तर माझ्या आवडीचं झालं होतं कारण मला त्यांच्या आणि माझा प्रवास सारखाच वाटायचा.
    • पहिली फिल्म शूट करतानाही अक्षयला संघर्ष करावा लागला. फिल्म अंधारात शूट करायचं असल्याने निळा कागद लावून शूट केलं होतं पण ते उमटलंच नाही. तेव्हा यंत्रणा इतकी अद्यावत नसल्याने तीन दिवसांनी आम्हाला ते कळलं. पुन्हा तोच संघर्ष, पुन्हा सगळी फिल्म शूट केली आणि शेवटी आमची पहिली फिल्म तयार झाली.
    • जेव्हा हा चित्रपट तयार झाला तेव्हा आम्ही तो पाहायला घेतला तर आमच्या असं लक्षात आलं की आम्हाला जो भयपट करायचा होता तो विनोदी सिनेमा झाला आहे. त्यातून आम्हाला सांगायचं खूप काही होतं पण ते जमलं नव्हतं अखेर पुढे जाऊन त्या फिल्मला एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये बक्षीस मिळालं आणि तिथून मला स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला.
    • त्यानंतर अक्षयनं FTI ची प्रवेशपरिक्षा दिली आणि त्यात देशात पहिला नंबर आला. हवं त्या कॉलेजमध्ये त्याला अॅडमिशन मिळालं होतं. कॉलेजच्या काळात अक्षयनं स्वत:ला वाहून दिलं….
    • रात्र-दिवस पुस्तकं वाचले, रोज २ ते ३ सिनेमे पाहायचा. इतकंच काय तर पैसे नसायचे म्हणून २०- २० किलोमीटर चालत जायचा आणि त्यातून वाचलेल्या पैशातून वडापाव खायचा.
    • या काळात अक्षयला स्वतःवर विश्वास आला होता की आपण कष्ट घेत आहोत आज ना उद्या यशस्वी नक्की होऊ. शेवटी तो 3 वर्षांचा कोर्स होता पण कॉलेजमध्ये काही घटना घडल्या आणि दुसऱ्या वर्षी कॉलेजसोडून दिलं.
    • कॉलेज सोडून दिल्यानंतर अक्षयच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा चालू झाला होता, तो रात्रभर जागा असायचा, मधेच गाडी काढून कुठेतरी फिरायला जायचा. सकाळी 7 वाजता झोपायचा. याच काळात फिल्म बनवण्याचं सुद्धा डोक्यात चाललं होतं. FTI सोडल्यामुळे एका वेगळ्याच फेज मध्ये होता, ज्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सगळे जीवाचे रान करतात ते कॉलेज सोडले होते.
    • हे सगळं सुरु असताना पैश्यांची तानाताण सुरूच होती. कॉलेज सोडलं होत तरी सुद्धा त्याला स्वतःवर इतका विश्वास होता की तो म्हणायचा लोकं माझी पदवी नाही तर माझा सिनेमा पाहणार आहेत.
    • पुढे प्रवासाची सुरुवात होत गेली, लोकं मिळत गेले, आयुष्यात पैसे यायला सुरुवात झाली. अक्षय ज्या माणसाच्या फिल्म्स पाहायचा त्याच्यासोबत एका जगप्रसिद्ध मासिकात स्थान मिळालं. त्रिज्या ही फिल्म जगभर गाजली. त्रिज्याच्या निमित्ताने जगभर फिरलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इतकंच काय तर कित्येक मोठ्या लोकांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली. एकेकाळी १२०० रुपयांत चित्रपट निर्माण करणाऱ्या अक्षयनं आज काही कोटींचा सिनेमा केलाय.
    • 1/

      खेडेगावातून आलेल्या अक्षयचा सिनेमा बर्लिनपर्यंत पोहचला… हे त्याच्या कष्ट, जिद्द आणि संघार्षाचं चीज आहे… १२०० रुपये भाडं असलेल्या खोलीत रहात असणारा एक कनिष्ठ मध्यवर्गीय २८ वर्षांचा भटक्या विमुक्त जातीतला पोरगा आज ३ आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिनेमे मिळवून काही कोटींचा व्यवहावर हँडल करतो आहे यावरून तुम्हाला त्याच्या खडतर प्रवासाचा अंदाज येईल.

Web Title: Solapur akshay indikar success story nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.