-

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत राणू अक्कांची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. (सर्व फोटो – अश्विनी महांगडे/इंस्टाग्राम)
-
रणरागिणीच्या रुपातील तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंसोबतच अश्विनीने दिलेले प्रेरणादायी कॅप्शन विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
-
'शिवरायांची लेक जणू ही शौर्याची तलवार आहे, म्यान फक्त शोभेला पण अन्यायावर वार आहे'
-
'मुलींनो आत्याचाराला बळी न पडता, छेड काढली तर मान खाली घालून सहन न करता, तलवार काढून जिरवता आली पाहीजे,' असं कणखर संदेश तिने कॅप्शनमधून दिला आहे.
-
मेणबत्त्याचे नाही तर शौर्याचे प्रतिक बना, असं ती म्हणतेय.
-
स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही तर, तळाशी जाऊन आव्हानांना भेदून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं, असे सकारात्मक ऊर्जा देणारे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहेत.
-
अश्विनी महांगडेनं 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.
-
या मालिकेशिवाय तिने 'बॉईज' चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली.
-
झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेतून अश्विनीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं.
शिवरायांची लेक जणू… अभिनेत्रीचा रणरागिणी लूक होतोय व्हायरल
Web Title: Swarajyarakshak sambhaji fame actress ashvini mahangade latest warrior theme photoshoot sdn