उत्तम अभिनय आणि हॉटनेसमुळे विशेष ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे वाणी कपूर. अनेकदा आपल्या फोटोमुळे वाणी चर्चेत येत असते. ( सौजन्य : वाणी कपूर इन्टाग्राम) सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या वाणीचा आज वाढदिवस. कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या वाणीने आज कलाविश्वात स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. दिल्लीत जन्म झालेल्या वाणीने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी येथून टूरिझ्मची बॅचलर डिग्री घेतली आहे. मात्र या क्षेत्रात करिअर करण्यापेक्षा वाणी कलाविश्वात अधिक रमली. टुरिझ्मची डिग्री घेतल्यानंतर वाणीने जयपूरमधील ओबेरॉय हॉटेल अॅण्ड रिसॉर्ट येथे इंटर्नशीप केली होती. त्यानंतर आयटीसी हॉटेलमध्ये ती कामासाठी रुजूदेखील झाली होती. हॉटेलमध्ये काम करत असतानाच वाणीची पावले मॉडेलिंगच्या दिशेने वळाली आणि ती मॉडेलिंग करु लागली. मॉडेलिंग करत असतानाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा वाणीने निश्चय केला. त्याच वेळी तिला २०१३ मध्ये शुद्ध देसी रोमांस या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. शुद्ध देसी रोमांस या चित्रपटात वाणीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. तसंच या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रादेखील मुख्य भूमिकेत झळकली होती. वाणीने कलाविश्वात फार मोजके चित्रपट केले आहेत. मात्र चित्रपटांपेक्षा तिच्या ग्लॅमरस फोटो आणि लाइफस्टाइलची कायमच चर्चा रंगत असते. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या वॉर चित्रपटातही वाणी झळकली आहे. वाणी कपूरचे वडील दिल्लीत फर्निचर एक्सपर्ट म्हणून काम करतात. सोबतच एक एनजीओदेखील चालवतात असं म्हटलं जातं. बोल्ड & बिंधास्त वाणी कपूर -
पारंपरिक पोशाखातही वाणी तितकीच ग्लॅमरस आणि सुंदर दिसते.
बोल्ड, बिनधास्त वाणी कपूरचे beautiful फोटो
पाहा, वाणी कपूरचे ग्लॅमरस फोटो
Web Title: Vaani kapoor birthday special know unknown facts about her ssj