
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर या अभिनेत्रींनी कलाविश्वात स्थान मिळवलं आहे. या अभिनेत्रींपैकी अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांची पूर्ण नावं फार कमी जणांना ठाऊक आहेत. त्यामुळे श्रीदेवींपासून ते तब्बूपर्यंत अशाच काही अभिनेत्रींची पूर्ण नावं काय हे जाणून घेऊयात. बॉलिवूडची हवाहवाई गर्ल म्हणून आजही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याकडे पाहिलं जातं. सौंदर्याने आणि उत्तम अभिनय शैलीमुळे श्रीदेवी यांनी प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. दाक्षिणात्य कुटुंबात जन्म झालेल्या श्रीदेवी यांचं पूर्ण नाव फार कमी जणांना माहित आहे. श्रीदेवी यांचं खरं नाव श्रीअम्मा यांगर अय्यपन असं आहे. परंतु, नाव मोठं असल्यामुळे त्यांनी कलाविश्वात केवळ श्रीदेवी इतकंच नाव लिहिण्यास सुरुवात केली होती. काजोल हे नाव बॉलिवूडसाठी नवीन नाही. एकापेक्षा एक सरस चित्रपट करणारी काजोल अभिनेत्री तनुजा आणि चित्रपट दिग्दर्शक सोमू मुखर्जी यांची लेक आहे. काजोलचं पूर्ण नाव काजोल मुखर्जी असं असून तीदेखील आईप्रमाणेच केवळ नावाने ओळखली जाते. गजनी या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे असीन. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर असीन बॉलिवूडकडे वळल्याचं दिसून आलं. असीनचं पूर्ण नाव असीन थोट्टूमकल असं आहे. सध्या असीन कलाविश्वापासून दूर असून आपल्या कुटुंबाला वेळ देत आहे. एकेकाळी आपल्या नृत्यकौशल्यामुळे अनेकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे हेलन. कलाविश्वात हेलन यांनी त्यांच अढळ स्थान निर्माण केलं आहे. हेलन यांचं खरं नाव हेलेन एन रिचर्डसन असं आहे. परंतु, त्यांनी कलाविश्वात येण्यापूर्वी नावामागील आडनाव हटवून केवळ हेलन इतकंच नाव ठेवलं. काही काळ कलाविश्वापासून दूर गेलेली अभिनेत्री तब्बू आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रीय झाली आहे. तब्बूचं पूर्ण नाव तब्बसुम हाशमी असं आहे. सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा! सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. आजही त्या तेवढ्याच सुंदर आणि उत्साही दिसतात. बॉलिवूडमध्ये आपल्या सदाबहार अभिनयाने आतापर्यंत अधिराज्य गाजवत असलेल्या श्रीदेवी यांचं पूर्ण नाव फार कमी जणांना माहित आहे. रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन. पण, अजूनही बऱ्याचशा लोकांना हे नाव चटकन आठवणार नाही. बेबी रेखा या नावाने त्यांनी प्रथम तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. १९७० मध्ये ‘सावन भादों’ या चित्रपटापासून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली.
Photo : श्रीदेवी ते तब्बू…जाणून घ्या अभिनेत्रींचं पूर्ण नाव
Web Title: Do you know the real name of these actress ssj