-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोच्या १४ व्या सीझनची सुरुवात येत्या ऑक्टोंबर महिन्यात होईल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेत्री सुगंधा मिश्रा हिची. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सुगंधाने बिग बॉसकडून ऑफर मिळाल्याचं मान्य केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बिग बॉसमध्ये भाग घेण्यासंदर्भात तिला विचारण्यात आलं होतं. परंतु तिने आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे या शोमध्ये जाण्यास नकार दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुगंधाचा 'गँग्स ऑफ फिल्मीस्तान' हा नवा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सध्या ती या शोच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळे एका शोवर काम करत असताना तिला दुसऱ्या शोमध्ये भाग घेणं शक्य होणार नाही त्यामुळे तिने बिग बॉसच्या यंदाच्या पर्वामध्ये झळकण्यास नकार दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुगंधाने एक स्टँड अप कॉमेडियन म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्याच दरम्यान तिला 'डोन्ट वरी चाचू' या विनोदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या मालिकेमुळे सुगंधाच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर तिने 'बाल वीर', 'तू मेरे अगल बगल है', 'कानपूर वाले खुरानाज' यांसारख्या अनेक विनोदी मालिकेत तिने काम केले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तसेच हिरोपंती आणि कमाल धमाल मालामाल या दोन चित्रपटांमध्येही ती झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
अभिनेत्रीने नाकारली ‘बिग बॉस’ १४ ची ऑफर; कारण…
Web Title: Sugandha mishra bigg boss 14 mppg