बॉलिवूडचा झगमगाट अनेकांना लोभसवाणा वाटतो. परंतु, या दुनियेत जसं ग्लॅमरस, पैसा, यश आणि प्रसिद्धी आहे. त्यासोबतच त्याची आणखी एक बाजूदेखील पाहायला मिळते. त्यातच बॉलिवूड आणि ड्रग्स किंवा तत्सम अंमली पदार्थ यांविषयी बऱ्याच वेळा चर्चा होते. अनेक सेलिब्रिटी ड्रग्ससारख्या अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याचंदेखील समोर आलेलं आहे. विशेष म्हणजे ड्रग्स आणि अंमली पदार्थ यांवर आधारित अनेक चित्रपटांचीदेखील निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे हे चित्रपट कोणते ते पाहुयात. ( सौजन्य :इंडियन एक्स्प्रेस/ सोशल मीडिया) गो गोवा गॉन – बॉलिवूडमधील बऱ्यापैकी चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे गो गोवा गॉन. कॉमेडी ड्रामा प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटातून ड्रग्सवर भाष्य करण्यात आलं आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत झळकला आहे. यात ड्रग्सच्या वापरामुळे त्याचे कसे परिणाम होतात हे या चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे. रामानंद सागर यांनी चरस या चित्रपटाची निर्मिती केली होती. १९७६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटाचं नावदेखील चरस असल्यामुळे सहाजिकच त्याविषयाभोवती या चित्रपटाची कथा फिरताना दिसते. यात धर्मेंद्र, कालीचरणला ड्रग्सचा व्यवसाय करण्यापासून कसा अडवतो हे दाखवण्यात आलं आहे. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची मुख्य भूमिका जाबाज चित्रपटात पाहायला मिळते. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. यात फिरोज खानदेखील झळकले होते. या चित्रपटात श्रीदेवी ड्रग्सच्या आहारी गेल्यामुळे तिचा मृत्यू होतं. त्यानंतर फिरोज खान ड्रग्सचा व्यापार थांबविण्यासाठी कसे प्रयत्न करतात हे दाखविण्यात आलं आहे. अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचा जलवा हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाची संपूर्ण कथा ड्रग्सभोवती फिरताना दिसते. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांच्या भावाची ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू होतो. त्यानंतर नसीरुद्दीन शाह संपूर्ण ड्रग्सचं रॅकेट उघडं करतात. अभिनेत्री प्रियांका चोप्रा या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली आहे. यात कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या नवोदितांना कसा स्ट्रगल करावा लागतो हे दाखविण्यात आलं आहे. प्रियांकासोबतच अभिनेत्री कंगना रणौत झळकली आहे. विशेष म्हणजे टॉप मॉडेल असलेली कंगना ड्रग्सच्या आहारी केल्यामुळे तिचं करिअर कसं उद्धवस्त होतं यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात ड्रग्स आणि अंमली पदार्थांच्या जगतातील अनेक बारकाव्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात ड्रग्स आणि अंमली पदार्थांच्या जगतातील अनेक बारकाव्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत झळकले आहेत. यात तरुण मुले ड्रग्सच्या आहारी कसे जातात हे दाखविण्यात आलं आहे. तसंच या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर-खानदेखील झळकली आहे. यातून तिने एक महत्त्वपूर्ण मेसेज दिल्याचं दिसून येतं.
फक्त बॉलिवूड पार्ट्यांमध्येच नाही तर सिनेमांमध्येही दिसली ड्रग्सची काळी दुनिया!
पाह, कोणते आहेत हे चित्रपट
Web Title: Bollywood films based on drugs sushant case ssj