-
अभिनेत्री अनुष्का शर्मा व क्रिकेटर विराट कोहली यांच्या घरात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. विराट-अनुष्काने हा खास फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. मात्र या फोटोतील अनुष्काचा ड्रेस आता चर्चेचा विषय ठरला आहे.
अनुष्काच्या या पोलका डॉट प्रिंट ड्रेसवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. प्रियांका चोप्रा, करीना कपूर खान, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या अभिनेत्रींचे त्याच पोलका डॉट प्रिंटमधले जुने फोटो शोधून काढून भन्नाट मीम्स तयार करण्यात आले. योगायोग म्हणजे क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा हिनेसुद्धा असाच ड्रेस घातला होता. नताशाने नुकताच मुलाला जन्म दिला आहे. अनुष्काच्या आधी करीना कपूर खानने ती गरोदर असल्याची बातमी जाहीर केली. त्यामुळे तिचेसुद्धा पोलका डॉट प्रिंटमधले फोटो पुन्हा व्हायरल करण्यात आले. -
'तारक मेहता..'मधील बबिताला त्या कपड्यांमध्ये पाहून जेठालालची काय प्रतिक्रिया असेल.. ते पाहा..
-
'अशी ही बनवाबनवी' या लोकप्रिय चित्रपटातील खास दृश्य
-
अनुष्काच्या ड्रेसवरील हे भन्नाट मीम्स पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल!
-
अभिनेत्री नेहा धुपियाच्या फोटोवरून भन्नाट मीम
-
(सर्व छायाचित्र सौजन्य- सोशल मीडिया)
‘पांढरे ठिपके कुठंय?’ अनुष्काच्या ड्रेसवरून भन्नाट मीम्स व्हायरल
Web Title: Anushka sharma polka dot dress that she wore while announcing pregnancy sends internet into a meme frenzy ssv