-

आपण बऱ्याच वेळा पडद्यावर कलाकरांना वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहतो. पण पडद्यावर दिसणारी कलाकारांची नाती खऱ्याखुऱ्या आयुष्यात फार वेगळी असतात. काही अभिनेत्यांनी तर ऑनस्क्रीन पालकांनाच खऱ्या आयुष्यात डेट केले आहे. काहींनी ऑनस्क्रीन आईशी लग्न केले तर काहींनी ऑनस्क्रीन सासूला डेट केले. आज आपण अशाच काही जोड्यांविषयी जाणून घेणार आहोत.
-
'बुनियाद' मालिकेत नीना गुप्ता यांनी आलोक नाथ यांच्या सुनेची भूमिका साकारली होती. पण खऱ्या आयुष्यात ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या त्यावेळी चर्चा रंगल्या होत्या.
-
सुपरहिट फिल्म मदर इंडियामध्ये सुनील दत्त आणि नर्गिस यांनी आई-मुलाची भूमिका साकारली आहे. खऱ्याखुऱ्यात आयुष्यात त्या दोघांनी लग्न केले होते.
-
एकता कपूरच्या 'बडे अच्छे लगते है' या मालिकेत राम कपूर आणि ईशा ग्रोवर यांच्यात वडिल मुलीचे नाते दाखवण्यात आले होते. पण खऱ्या आयुष्यात ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने ऑनस्क्रीन सासू स्मिता बंसला डेट केले होते. ते दोघे बालिका वधू या मालिकेत एकत्र दिसले होते.
-
अंकित गेराने त्याच्या ऑनस्क्रीन आई मोनिका सिंहला डेट केले होते. त्यांनी मन की आवाज प्रतिज्ञा मध्ये भूमिका साकारली आहे.
-
टीव्ही सीरियल 'मायावी मलंग'मध्ये अपर्णा कुमार आणि हर्षद अरोराने भूमिका साकारली होती. ते दोघे एकमेकांना डेट करत होते.
हे कलाकार ऑनस्क्रीन पालकांच्या पडले प्रेमात; कुणी आईशी केलं लग्न, तर काहींनी…
जाणून घ्या या कलाकारांच्या जोड्यांविषयी…
Web Title: Actors who fall in love with their onscreen parents avb