-
ऐश्वर्या राय, सलमान खान आणि विवेक ओबेरॉय या त्रिकुटामधील वाद सर्वश्रुत आहे.
सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि विवेक यांच्यातील जवळीक वाढली होती. विवेक आणि ऐश्वर्याला अनेक कार्यक्रमांमध्ये एकमेकांसोबत पाहिलं गेलं होतं. अशातच एकदा टेलिव्हिजनवरील एका मुलाखतीत विवेकने ऐश्वर्यावरील प्रेम खुलेपणाने व्यक्त केलं. मात्र नंतर त्याचा परिणामसुद्धा त्याला भोगावा लागला होता. करण जोहरच्या 'कॉफी विद करण' या चॅट शोमध्ये विवेकला ऐश्वर्याशी निगडीत एक प्रश्न विचारण्यात आला होता. 'ऐश्वर्या राय हॉलिवूडमध्ये आहे की हिंदी चित्रपटांमध्ये' असा प्रश्न विवेकला करणने विचारला असता त्यावर अनपेक्षित असं उत्तर ऐकायला मिळालं. 'ती माझ्या मिठीत आहे' असं म्हणत विवेकने खुलेपणाने प्रेम व्यक्त केलं होतं. त्यावेळी तो ऐश्वर्याला डेट करत होता. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत विवेकने सलमानकडून धमक्या मिळत असल्याचा खुलासा केला होता. २००३ मध्ये विवेकने म्हटलं होतं, "सलमान खानने मला नशेत फोन केला आणि जिवे मारण्याची धमकी दिली." या संपूर्ण प्रकरणानंतर विवेकने सलमानची माफीसुद्धा मागितली होती. मात्र इतक्या वर्षांनंतर आजसुद्धा सलमान आणि विवेक एकमेकांसमोर यायला कचरतात. ‘कंपनी’, ‘साथिया’, ‘मस्ती’ यांसारखे हिट चित्रपट देणाऱ्या विवेकला २००३च्या मुलाखतीनंतर निर्माते काम देण्यासाठी घाबरू लागले. यावर एका वृत्तपत्राला मुलाखत देताना विवेकने, त्यावेळी त्या व्यक्तीने माझ्याविरोधात जणू फतवाच काढल्यासारखे वाटत होते, असे म्हटले. आपले वैयक्तिक आयुष्य कसे उध्वस्त झाले याबद्दल विवेक म्हणाला की, वैयक्तिक आयुष्यात गोंधळ माजल्यामुळे माझे कशातच लक्ष लागत नव्हते. त्यानंतर मी हिट चित्रपट देऊनही मला कोणी काम देत नव्हते. ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ हा माझा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. पण, तरीही वर्षभर मला घरातच बसून राहावे लागले, अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली होती. विवेकने लागोपाठ ९ ते १० चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते.
‘ती माझ्या मिठीत आहे’; ऐश्वर्याबद्दल विवेकचे असे वक्तव्य ऐकताच भडकला होता सलमान
Web Title: When vivek oberoi said about aishwarya rai that she is in my arms made salman khan angry ssv