-
बॉलिवूड चित्रपटांतील काही पात्र अशी असतात जी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. कधी कधी ती भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना त्याच नावाने ओळखले देखील जाते. चला पाहूया बॉलिवूड चित्रपटांमधील काही गाजलेली पात्रे..
-
चतुरंग रामालिंगम उर्फ सायलेंसर : 2009मध्ये प्रदर्शित झालेला ३ इडियट्स हा चित्रपट प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने पाहतात. या चित्रपटातील पात्रे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. खास करुन सायलेंसर हे पात्र. अभिनेता ओमी वैद्यने ही भूमिका साकारली होती. पण आज ओमीला सायलेंसर म्हणूनच ओळखले जाते.
-
३ इडियट्समधील आणखी एक पात्र मिलिमीटर हे देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. हे पात्र राहुल कुमारने साकारले होते. आणि लहानपणीची मिलिमीटरची भूमिका मनमोहनने साकारली होती. त्या दोघांनाही मिलिमीटर म्हणूज अनेक लोकं ओळखतात.
-
गँग्स ऑफ वासेपुर चित्रपटातील आपल्या वेगळ्या स्टाईलसाठी परपेंडीकुलर हे पात्र चर्चेत होते. ही भूमिका अभिनेता आदित्य कुमारने साकारली होती.
-
लगान चित्रपटातील कचरा हे पात्र अनेकांना आजही लक्षात आहे. ही भूमिका आदित्य लाखियाने साकारली होती.
-
जब वी मेट या २००७मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील अंशुमन हे पात्र विशेष गाजलं. चित्रपटात करीना कपूरच्या बॉयफ्रेंडचे नाव अंशुमन दाखवण्यात आले होते. अंशुमनची भूमिका तरुण अरोराने साकारली होती.
-
धमाल चित्रपटातील मुथुस्वामी वेणुगोपाल अय्यर हे पात्र सर्वांच्या लक्षात आहे. ही भूमिका अभिनेते विनय आपटे यांनी साकरली होती. (All Photo : Youtube)
हे कलाकर स्वत:च्या नव्हे तर चित्रपटातील नावाने ओळखले जातात
Web Title: Actors known by their screen names avb