बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त जाणून घेऊयात या 'हॉट कपल'ची लव्ह स्टोरी… करीना कपूरसोबतचे शाहिदचे अफेअर बरेच गाजले होते. पण त्यानंतर शाहिदने फिल्म इंडस्ट्रीतील एखाद्या अभिनेत्रीऐवजी सर्वसामान्य तरुणीची जोडीदाराच्या रुपात निवड केली. शाहिदचे आईवडील पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक (सावत्र आई) यांनी शाहिदसाठी मीराला पसंत केले होते. ७ जुलै २०१५ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली असून त्यांना दोन मुलंदेखील आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असणारी ही जोडी अनेक वेळा इन्स्टा, फेसबुक यांच्या माध्यमातून आपल्या फॅमिलीचे किंवा मुलांचे फोटो शेअर करताना दिसतात. शाहिद कपूरपेक्षा मीरा राजपूत तब्बल १३ वर्षांनी लहान आहे. वयातील अंतर पाहून सुरुवातीला मीरा शाहिदसोबत लग्नास तयार नव्हती. लग्नाच्यावेळी शाहिद ३४ वर्षांचा तर मीरा २१ वर्षांची होती. लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली आहे. शाहिद-मीरा या जोडीला सोशल मीडियावर लोक खूप पसंत करतात. दोघांच्या रोमँटिक फोटोला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात.. शाहिद-मीराचं लग्न अरेंज मॅरेज आहे. पण त्यांचं हे लग्न एखाद्या फिल्मी लव्ह स्टोरीपेक्षा कमी नाही. मीरा १६ वर्षाची असताना एका कार्यक्रमात शाहिदला भेटली होती. ती म्हणते की, यावेळी मला वाटलेही नव्हते की, भविष्यात हा माझा जोडीदार होईल. शाहिद आणि मीरा यांना त्यांच्या आई वडीलांनी पसंत केलं होतं. त्यानंतर एकमेंकाना भेटण्यास संधी मिळाली. यापूर्वी त्यांच्यमध्ये कोणताही चर्चा झाली नव्हती. पहिल्या भेटीनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांची पहिली भेट एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे झाली होती. दोघांच्या ओळखीच्या एका मित्राच्या फार्महाउसवर दोघांची पहिली भेट झाली होती. तब्बल सात तास दोघांमध्ये चर्चा झाली होती. या भेटीनंतर दोघांनी एकमेंकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नापूर्वी मीराचे हिंदी चित्रपट सृष्टीसोबत कोणतेही नाते नव्हते. असे असतानाही एका सेलिब्रिटीची पत्नी, त्यामुळे वाट्याला आलेली प्रसिद्धी आणि आता एक आई अशा बऱ्याच जबाबदाऱ्या मीराने लिलया पेलल्या आहेत. -
शाहिदपेक्षा मीरा सोशल मीडियावर जास्त सक्रीय आहे. मीरा कलाविश्वामध्ये सक्रीय नसली तरी ती काही जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे.
बॉलिवूडचं ‘हॉट कपल’ शाहिद-मीराची… Love Story
Web Title: Happy birthday mira rajput mira rajput shahid kapoor love story nck